कुबल विमानतळावर मारा केलेल्या रॉकेटला अमेरिकी मिसाईल डिफेंन्स सिस्टिमने रोखले

काबुल ,

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर मारा केलेल्या एका रॉकेटला सोमवारी अमेरिकी क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीने रोखून नष्ट केले. व्हाईट हाऊसने या हल्ल्याला दुजोरा दिला  आणि म्हटले की अफगाणिस्तानमधून माघारीचे अभियान निर्बांधपणे सुरु राहिल.

बीबीसीच्या बातमीमध्ये सांगगण्यात आले की ही घटना अमेरिकी ड्रोन हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी घडली असून एक दिवसापूर्वी अधिकार्‍यांनी हवाई तळावर एक हल्ला केला होता

अमेरिका मंगळवार पर्यंत आपल्या सैनिकांना माघारी बोलावेल आणि अफगाणिस्तानमधून पूर्ण माघारीसाठी योजना बनवत आहे. सोमवारी सकाळी अफगाण मीडियाने सांगितले की एका कारमधून पाच रॉकेटचा मारा करण्यात आला जे काबूलवरुन  विमानातळाकडे उडत होते.

एका अमेरिकन अधिक़ा-याने एका न्यूज वायरला सांगितले की त्यांच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणाने या रॉकेटला नष्ट केले.

स्थानिय वृत्तपत्र आटलेटसद्वारा केलेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये काबुलच्या छतांवर धुर दिसून येत आहे आणि रस्त्यावर  जळत्या कार दिसून येत आहेत.

व्हाईट हाऊसने म्हटले की राष्ट्रपती जो बाइडेनना रॉकेट हल्ल्या बाबतची माहिती दिली गेली आहे. बातमीमध्ये सांगण्यात आले की व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकीनी निवेदनात म्हटले की राष्ट्रपतीना माहिती देण्यात आली होती की काबुल विमानतळ (एचकेआयए) वर ऑपरेशन निर्बांधपणे सुरु आहे. त्यांनी आपल्या आदेशात परत एकदा दुजोरा दिला की कमांडर जमिनीवर आमच्या दलांच्या संरक्षणासाठी जे काही आवश्यक आहे त्यांला प्राथमिकता देण्यासाठी आपल्या प्रयत्नाना दुप्पट करावे.

सोमवारच्या घटनेतून आता पर्यंत कोणत्याही अमेरिकी किंवा अफगानीच्या प्राणहानी झाल्याची माहिती नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!