विद्यार्थीनीना वेगळ्या वर्गात शिकविले पाहिजे – अब्दुल बकी हक्कानी
काबुल,
अफगाणिस्तानमध्ये यापुढे विद्यार्थीनीना वेगळ्या वर्गात शिकविले जाईल असे मत तालिबानद्वारा नियुक्त अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण मंत्रालयाचे कार्यवाहक मंत्री अब्दुल बकी हक्कानीनी व्यक्त केले.
टोलो न्यूजच्या बातमीनुसार रविवारी सरकारी आणि खाजगी विद्यापीठांच्या अधिकारी आणि मंत्रालयातील कर्मचार्यांशी बोलताना हक्कानीनी म्हटले की अफगाणिस्तानच्या मुंलीना शिकण्याचा अधिकार आहे परंतु त्या मुलांसह एकाच वर्गात शिकू शकत नाहीत. त्यांनी म्हटले की विद्यार्थीनीसाठी सुरक्षीत शैक्षणिक वातावरण उपलब्ध केले जाईल.
बातमीनुसार या दरम्यान माजी उच्च शिक्षण मंत्री अब्बास बसीर यानी या कार्यक्रमात म्हटले की तालिबानने शिक्षण क्षेत्र आणि उच्च शिक्षण मंत्रालयात मागील दोन दशकातील यशांना संरक्षीत करण्याचे आश्वासन दिले आहे. उच्च शिक्षण मंत्रालयाने सिस्टिम मेकिंगच्या प्रकरणात कोणत्याही अन्य विभागाच्या तुलनेत चांगली प्रगती केली आहे.
खाजगी विद्यापीठांच्या केंद्रिय अधिकार्यांनी म्हटले की अधिकांश कायदे खाजगी विद्यापीठांवर लागू केले गेले आहेत आणि त्यांनी नवीन कार्यवाहक मंत्र्यांना पुढील सरकारमध्ये या समस्यांवर समाधान करण्याचा आग-ह केला.
खाजगी विद्यापीठांच्या संघाचे प्रमुख तारिक कुमानी म्हटले की मोठी समस्या ही कायद्यात आहे आणि आम्हांला वाटते की मंंत्रालयातील अधिकारी त्यांना लवकर परत एकदा लिहितील.
नवीन कार्यवाहक उच्च शिक्षण मंत्र्यांनी म्हटले की विद्यापीठाना लवकरच परत एकदा सुरु केले जाईल आणि व्याख्याता आणि मंत्रालयातील कर्मचार्यांचे वेतन दिले जाईल.