अफगाणिस्तानातील शेवटचा बुर्जही ढासळणार? पंजशीर खोर्‍यात घुसखोरी केल्याचा तालिबानचा दावा

काबूल,

काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती विस्फोटानंतर जगभरातील बडे देश सतर्क झाले आहेत. अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी या देशांनी हालचाली तीव- केल्या आहेत. तीन दिवसांपूर्वीच बि-टननं आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. तर अमेरिकेनं 31 ऑॅगस्टपर्यंत सर्वांनी परत यावं, अशी तारीख निश्चित केली आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून आंतराष्ट्रीय राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहे. अशात आता अफगाण नागरिकांची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे.

तालिबान संघटनेच्या सैनिकांनी पंजशीर खोर्‍यात घुसखोरी केल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंजशीर येथे नॉर्दन आघाडीचे नेते आणि तालिबान नेत्यांमध्ये एकमेकांवर हल्ला न करण्यावर सामंजस्य करण्यात आलं आहे. दोन्ही गटाकडून सीजफायरबाबत एकमत झालं होतं. असं असूनही तालिबानी बंडोखेर पंजशीर खोर्‍यात शिरल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे.

मात्र, पंजशीरचा वाघ म्हणून ख्याती असणारा अहमद शाह मसूदचा मुलानं तालिबाननं केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. पंजशीरमध्ये तालिबाननं घुसखोरी केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. अफगाणिस्तानातील स्थानिक वृत्तवाहिनी टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून सर्व देश आपापले नागरिक आणि सुरक्षा काढून घेत असताना, त्याठिकाणी आता तालिबान आपली सुरक्षा वाढवत आहे. अफगाणिस्तानात ज्या इमारतीसमोर अमेरिकन सैनिक तैनात असायचे, अशा अनेक महत्त्वाच्या इमारतींमध्ये आता तालिबानानं आपले सैनिक उभे केले आहेत.

काबूल विमानतळावरील विस्फोटांनंतर याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तालिबाननं विमानतळाभोवती आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले सैनिक तैनात केल्याचं वृत्तही समोर आलं आहे. 31 ऑॅगस्ट रोजी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य पूर्णपणे निघून गेल्यानंतर काबूल विमानतळ तालिबानच्या ताब्यात जाणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांची सुटका होणं जवळपास अशक्य होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!