लीडवर टीम इंडियाने लाज घालवली, कागदी शेर 78 रनवर ऑॅल आऊट
हेडिंग्ले,
लॉर्ड टेस्टवर ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर टीम इंडियाने लीड टेस्टमध्ये लाजिरवाणी कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय टीम इंडियाच्या चांगलाच अंगाशी आला. फक्त 78 रनवर टीम इंडियाचा ऑॅल आऊट झाला आहे. दिवसाच्या पहिल्या 50 मिनिटांमध्येच टीम इंडियाने सुरुवातीचे तीन शिलेदार गमावले. लॉर्ड टेस्टमध्ये शतक करणारा केएल राहुल शून्य रनवर, चेतेश्वर पुजारा 1 रनवर आणि विराट कोहली 7 रन करून आऊट झाला. यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने टीम इंडियाचा डाव सावरण्यास मदत केली, पण अजिंक्य रहाणे लंचच्या आधी आऊट झाला. लंचनंतरही रोहित शर्मा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत होता, पण तोदेखील खराब शॉट मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाच्या विकेटची पडझड सुरूच राहिली. इंग्लंडकडून जेम्स अंडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर ओली रॉबिनसन, सॅम करन यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं.
टीम इंडियाचा स्कोअर 675 एवढा होता, पण काही क्षणांच्या आतच एकही रन न काढता टीमने 4 विकेट गमावल्या आणि हीच अवस्था 679 एवढी झाली.
लॉर्ड टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणार्या 11 जणांनाच विराटने टीममध्ये संधी दिली आहे, त्यामुळे आर.अश्विनला पुन्हा एकदा टीमबाहेर बसावं लागलं आहे. तर इंग्लंडने टीममध्ये दोन बदल केले आहेत डॉम सिबलीच्या जागी डेव्हिड मलान आणि मार्क वूडच्या जागी क्रेग ओव्हरटन यांचा टीममध्ये समावेश झाला आहे.
लॉर्ड टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.
भारतीय टीम
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ॠषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज