बि-टनने अफगाणिस्तानातून चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

लंडन,

13 ऑॅगस्टपासून ते आतापर्यंत अफगाणिस्तानातून सुमारे चार हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे बि-टनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याविषयी अधिकची माहिती दिलेली नसली तरी या चार हजार नागरिकांमध्ये बहुतांश अफगाणी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

अफगाणी मित्रांचा समावेश

गेल्या 20 वर्षांपासून बि-टनला मदत करणार्‍या अफगाणी नागरिकांचा यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. बि-टिश सैन्यदलाने अफगाणिस्तानातून बाहेर काढलेल्या चार हजार नागरिकांशिवाय अजून पाच हजार अफगाण मित्र बाहेर निघण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. यात भाषांतरकार, चालक अशा व्यक्तींचा समावेश आहे. बि-टिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या माहितीनुसार बि-टनने गेल्या बुधवारपर्यंत दोन हजार अफगाणी आणि 300 बि-टिश नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले होते.

काबूल विमानतळावर सैन्यदल तैनात

बि-टिश नागरिक आणि अफगाण नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सशस्त्र सैन्यदल अथकपणे काबूल विमानतळावर कार्यरत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने टिवटरवरून सांगितले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!