काबुल विमानतळावर अनागोंदी; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू

काबुल,

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता हाती घेऊन आता एक आठवडा झाला आहे. या काळात देश सोडून जाण्यासाठी अनेक अफगाणी नागरिकांनी काबुल विमानतळावर मोठी गर्दी केली असून त्या ठिकाणी अनागोंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती बि-टनच्या लष्कराने दिली आहे.

काबुल विमानतळावरचं वातावरण अजूनही तणावपूर्ण असून आपल्याकडून जे काही शक्य आहे ते आपण करत असल्याचं बि-टनच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यापासून देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांनी काबुल विमानतळावर गर्दी केली आहे. अशातच हवेत गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनागोंदीचे वातावरण निर्माण झालं असून त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी गोळीबार नेमकं कोणत्या ठिकाणाहून आणि कोणाकडून करण्यात येत आहे याची माहिती नाही.

चार दिवसांपूर्वीही काबुल विमानतळावर गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये पाच अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

भारतीयांना परत आणले

अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर आता त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी परत आणण्याचे काम जोरात सुरु आहे. आज सकाळी भारतीय वायुदलाच्या आणि एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून जवळपास अडीचशे भारतीय दिल्लीत परतले.

भारतीय वायुदलाच्या ण्-17 विमानाने आज सकाळी 168 भारतीय वायुदलाच्या हिंडन बेसवर दाखल झाले. त्या आधी एअर इंडियाने 87 भारतीयांना नवी दिल्लीत सुखरुप आणले. काल 150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त आल्यानंतर भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला. अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामामध्ये ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!