अमेरिका : टेनेसीमध्ये पुरामुळे आठ लोकांचा मृत्यू, 30 पेक्षा अधिक बेपत्ता

वॉशिंग्टन,

अमेरिकेतील टेनेसीमध्ये आलेल्या भिषण पुरामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

रविवारच्या बातमीनुसार हम्फ्रीज काउंटीचे शेरिफ क्रिस डेव्हिसने द टेनेसीयन वृत्तपत्राला सांगितले की 28 वर्षातील सर्वांत धोकादायक हा पुर आहे. विज खंडीत झाल्याने सेल फोन सेवांच्या कमीमुळे समस्यां अजूनच वाढल्या आहेत.

द टेनेसीयनच्या बातमीनुसार मध्य टेनेसीतील काही भागामध्ये शनिवारी झालेल्या 12 इंच पावसानंतर पूर्ण काउंटीमधील ग-ामीण भागातील रस्ते व महामार्ग वाहून गेले.

राष्ट्रीय हवामान सेवाने म्हटले की पावसाने नदीतील जलस्तराचा विक्रम मोडला आहे. नैशविले नॅशनल व्हेदर सर्व्हिसने शनिवारी टिवीट केले की स्थिती जीवनातील धोकादायक होती.

एनडब्ल्यूएस नैशविलेच्या हवामान शास्त्रज्ञ क्रिसी हर्लेनी द टेनेसीनला सांगितले की लोक आपल्या घरामध्ये अडकले आहेत आणि त्यांच्याकडे बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही. पाणी गळ्या पर्यंत आले आहे आणि हे विनाशकारी आहे. ही सर्वांत धोकादायक स्थिती आहे.

स्थानिय मीडियातील बातमीनुसार रहिवाश्यांच्या मदतीसाठी टेनेसी राष्ट्रीय गार्डला काउंटीमध्ये तैनात करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!