कोहलीची आक्रमकता मर्यादेमध्ये असली पाहिजे – इंजीनियर
लंडन,
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मी प्रशवंसा करतो परंतु त्यांने आपल्या आक्रमकतेला मर्यादेमध्ये ठेवले पाहिजे असे मत भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजीनियरनी व्यक्त केले.
इंग्लंड दौर्यात लॉडर्सवर नुकत्याच झालेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली व इंग्लंडचा जेम्स अँडरसन यांच्यात वाद झाला होता. हा सामना भारताने 151 धावांनी जिंकला.
इंजीनियरनी स्पोटर्स तक वरील चर्चेत म्हटले की मी कोहलीचा प्रशवंसक आहे, तो एक आक्रमक कर्णधारही आहे हे चांगले आहे परंतु याचीही मर्यादा असली पाहिजे. जर असे झाले नाही तर सामना अधिकारी आणि पंच हस्तक्षेप करतील. अनेक वेळा तो खूप आक्रमक होतो परंतु मला त्याची आक्रमकता पसंत आहे. कोहली एक खूप चांगला कर्णधार आहे. तो जगतील सर्वांत चांगल्या फलंदाजांपैकी एक आहे.
83 वर्षीय माजी खेळाडू इंजीनियरानी म्हटले की जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने इंग्लंडच्या विरुध्द दुसर्या डावात 89 धावांची जी भागेदारी केली ती उत्कृष्ट होती.
त्यांनी आपल्या करीअरच्या दिवसांमध्ये स्लेजिंग बाबत सांगितले की ते विरोधी संघाला आपल्या मैदानी प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तर देण्यावर लक्ष केंद्रित करत होते. ते आम्हांला ब्लडी इंडियंस म्हणत होते, त्यानी आमच्या उच्चारणाचा उपहास केला परंतु मी त्यांना उत्तर दिले. मी त्यांना धावा आणि यष्टीरक्षण आणि असे सर्व करुन खेळपट्टीवर उत्तर दिले.