टोकियो पॅराऑॅलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात 6 अधिकार्‍यांना उपस्थित राहण्यास परवानगी

टोकियो,

टोकियो पॅराऑॅलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडणार आहे. या सोहळ्यात भारताच्या सहा अधिकार्‍यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय पॅराऑॅलिम्पिकचे महासचिव गुरूशरण सिंग यांनी याची माहिती आज दिली.

टोकियो पॅराऑॅलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात, भारतीय दल 11 जणांचा असणार आहे. यात 6 अधिकारी आणि 5 पॅरा अ‍ॅथलिट असतील. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व अ‍ॅथलिटस परवानगी आहे. परंतु, भारताचे आतापर्यंत फक्त 7 अ‍ॅथलिट टोकियोला पोहोचले आहेत. यातील पाच जण उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

टोकियोत पोहोचलेल्या सात पॅरा अ‍ॅथलिटमध्ये टेबल टेनिसपटू सोनल पटेल आणि भाविना पटेल यांचा समावेश आहे. बुधवारी या दोघींचा सामना आहे. यामुळे त्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. जपानचे स्र-ाट नारुहितो हे या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.

भारतीय पॅराऑॅलिम्पिक समितीचे महासचिव गुरूशरण सिंग यांनी सांगितलं की, उद्घाटन सोहळ्यात केवळ सहा अधिकार्‍यांना सामिल होण्याची परवानगी आहे. तर कितीही अ‍ॅथलिट यात सहभागी होऊ शकतात. त्यांना याची परवानगी आहे. टेबल टेनिसपटूंचे बुधवारी सामने होणार आहेत. यामुळे ते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.

टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक मरियप्पन थंगावेलू आहे. त्याच्यासोबत डिस्कस थ-ोवर विनोद कुमार, भालाफेकपटू टेक चंद, पावर लिफ्टर जयदीप यांच्यासह सकिना खातून ही देखील या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहे. तर अधिकार्‍यांमध्ये सहा पैकी चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.

गुरूशरण सिंह, अरहान बागती, वी के डबास, मरियप्पनचे प्रशिक्षक सत्यनारायण हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आणखी दोन नावे लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. दरम्यान, भारताने टोकियो पॅराऑॅलिम्पिकसाठी 54 अ‍ॅथिलटचा संघ पाठवला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!