सुडोकू खेळाचे गॉडफादर माकी काजी यांनी वयाच्या 69 व्या घेतला अखेरचा श्वास

टोकियो

सुडोकू हे कोडे तुम्ही कधी सोडवले असेल. या कोड्यांना पूर्ण सोडवल्याशिवाय अर्ध्यात सोडून द्यावे वाटत नाही. हे कोडे वर्तमानपत्रासह ऑॅनलाईनही खेळता येते. जगभरात सुडोकू लोकप्रिय आहे. या सुडोकू खेळाचे गॉडफादर माकी काजी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी मिताका शहरात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची जपानी कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली.

माकी काजी यांचा जन्म 1951 मध्ये रेपोरोमध्ये झाला होता. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले नव्हते. मात्र, त्यांना नेहमीच सुडोकू गेमची आवड होती. त्यांनी हा गेम जगातील 100 देशापर्यंत पोहचवला. आज क्वचितच एखादी व्यक्ती असेल, जीला सुडोकूबद्दल माहिती नाही. खरे तर सुडोकूचा शोध स्विस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर यांनी 18 व्या शतकात लावला होता. मात्र, काजींनी त्याला लोकप्रिय बनवले.

शिक्षण सोडून झाले अंकाचे जादूगर –

माकी काजी यांनी कियो विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, 1970 मध्ये जपान – अमेरिका सुरक्षा कराराला विरोध झाला आणि त्यांना शिक्षण सोडावे लागले. यानंतर काजी एका प्रिंटिंग कंपनीत कामाला लागले. तिथे त्यांनी पहिल्यांदा एका अमेरिकन मासिकात सुडोकू क्रॉसवर्ड गेम पाहिला. येथूनच त्यांचे अंकाप्रती प्रेम वाढले. यानंतर त्यांनी 1980 मध्ये आपल्या एका मित्रोसोबत ’पझल सुशिन निकोली’ हे जपानचे पहिले कोड्यांचे मासिक सुरू केले. स्विस गणितज्ञ यांच्या कोड्यात थोडा बदल करून त्यांनी थोडी वेगळी कोडी तयार केली आणि तिन महिन्यांमधून निघणार्‍या आपल्या मासिकात प्रकाशित करणे सुरूच ठेवले. 1983 मध्ये त्यांनी निकोली नावाची कंपनी स्थापन केली.

जगातील 100 देशात सुडोकूचे चाहते –

जपानमध्ये भरपूर यश मिळाल्यानंतर त्यांनी इतर देशात सुद्धा आपले मासिक पोहचवले. जपानच्या बूक स्टोअर्समध्ये हे प्रसिद्ध होतेच. तर आता सुडोकू अशियन देशातील लोकांच्या सुद्धा पंसतीस उतरले. वर्ष 2004 मध्ये बि-टिश वंशाच्या एका प्रशंसकाने जपान दौर्‍यात ते पाहिले आणि ‘द टाइम्स’ वृत्तपत्रात त्यास जागा दिली. यानंतर हा गेम जगभरात प्रसिद्ध झाला. जगातील 100 पेक्षा जास्त देशात सुडोकूचे चाहते आहेत. जगभरात जवळपास 10 कोटी लोक सुडोकू हा खेळ खेळतात.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!