अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार – अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन
वॉशिंग्टन (अमेरिका),
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचा जोरदार बचाव राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केला. त्यांनी कबूल केले की, अफगाणिस्तानातील परिस्थिती अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने बदल घडला आहे.
अफगाणिस्तानवर तालिबान या अतिरेकी संघटनेचे नियंत्रण आणि अफगाण कोसळल्यानंतर आपल्या पहिल्याच संबोधनात बायडेन यांनी तेथील सध्याची परिस्थितीवर भाष्य केले. आपल्या संबोधनात त्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी तेथील नेत्यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, अफगाणच्या नेत्यांनी हार मानली आणि देश सोडून पळून गेले. यामुळे लष्कराने शरणागती पत्करली.
ते म्हणाले, मी माझ्या निर्णयामागे उभा आहे. 20 वर्षांनंतर मी कठीण पद्धतीने शिकलो की, अमेरिकन सैन्याला मागे घेण्याची चांगली वेळ नव्हती आणि म्हणूनच आम्ही अजूनही तिथे आहोत. आम्ही जोखिमेबाबत स्पष्ट होते. आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी योजना बनवली होती. मात्र, आमच्या अपेक्षापेक्षा अधिक वेगाने परिस्थिती बदलली. येथील राजनेत्यांनी हार पत्करली आणि ते देश सोडून पळून गेले. यामुळे सैन्यदलानेही आपला आत्मविश्वास गमावला.
दरम्यान, तालिबानी या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील राष्ट्रपती निवासस्थानावर नियंत्रण मिळवले. याआधी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पळ काढला आणि त्यांचे सरकार कोसळले. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता अमेरिकेवर टीका करण्यात येत आहे.