अफगाणिस्तान : शहरावर कब्जा करताच हेरातचे गव्हर्नर इस्माइल खानने तालिबान समोर केले आत्मसमर्पण

काबूल,

युध्दग-स्त अफगाणिस्तानमधील तिसरे सर्वांत मोठे शहर हेरातवर शुक्रवारी तालिबानने ताबा मिळविताच राज्याचे गव्हर्नर व मुजाहिदीनचे माजी नेते मोहम्मद इस्माइल खानने तालिबान समोर आत्मसमर्पण केले.

प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, तालिबानी समूहाद्वारा सर्व प्रमुख सरकारी संस्थांवर कब्जा करण्यात आला. हेरातचे गव्हर्नर, पोलिस प्रमुख, हेरातमधील एनडीएस कार्यालयाचे प्रमुख, मुजाहिदीनचे माजी नेते मोहम्मद इस्माइल खान,. उप गृह सुरक्षा मंत्री  आणि  जफर कॉर्पसच्या 207 कमांडरांसह सर्व सरकारी अधिकार्‍यांनी राज्यावर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या समोर आत्मसमर्पण केले.

हेरात शहराच्या बाहेरील भागामध्ये जवळपास तीन आठवडया पासून संघर्ष सुरु होता. तालिबानला सुरक्षा आणि संरक्षण दलांच्या प्रतिरोधाचा सामना करावा लागला होता. जे इस्माइल खानच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बंडखोर दलां बरोबर होते.

अफगाणिस्तानमधील पश्चिम भागातील निमरोज, फराह, घोर आणि बडघिस जे राज्य मागील एक आटवडयात तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर शुक्रवारी हेरातही पडले.

तालिबानने आता पर्यंत कमीत कमी 17 राज्यांच्या राजधानींवर कब्जा केला असून काबुल शहरा पासून 70 किमी दक्षिणमधील लोगार राज्यात घणघोर संघर्ष सुरु आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!