टीम इंडियानं केली होती तक्रार, अंपायरमुळे हुकलं रोहितचं ऐतिहासिक शतक

लॉर्ड,

लॉर्ड टेस्टमधील रोहित शर्मानं भारतीय फॅन्सचं मन पुन्हा एकदा जिंकलं आहे. रोहितनं लॉर्डवर 83 रनची खेळी केली. रोहितची शतकाच्या दिशेनं सहज वाटचाल सुरू होती. त्यावेळी 44 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या आतमध्ये येणार्‍या बॉलवर रोहित बोल्ड झाला. अँडरसनचा आतमध्ये येणारा बॉलर रोहितला समजला नाही आणि त्याची खेळी संपुष्टात आली. अँडरसनचा चांगला बॉल हे रोहित शर्मा आऊट आऊट होण्याचं एकमेव कारण नव्हतं.

रोहित शर्मा आऊट होण्याच्या एक ओव्हर आधी केएल राहुलनं अंधूक प्रकाशाची तक्रार अंपायरकडं केली होती. अंपायरनं तरीही खेळ सुरू ठेवला. अंपायरनं राहुलच्या तक्रारीची दखल घेत योग्य कारवाई केली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं.

रोहित शर्माला विदेशात पहिले टेस्ट शतक झळकावण्याची संधी होती. रोहित गेल्या 15 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. पण विदेशातील टेस्ट मॅचमध्ये त्याचं एकही शतक नाही. लॉर्ड मैदानावर भारतीय ओपनरनं 31 वर्षांपूर्वी शतक झळकावले होते.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीनं (ठर्रींळ डहरीीींळ) 1990 साली ओपनिंगला येत लॉर्डवर शतक झळकावले होते. त्यानंतर रोहितला या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती. पण त्याचे शतक 17 रननं हुकले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!