झडॠ क्लबसोबत जोडला गेल्यानंतर लिओनेल मेस्सीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

पॅरिस,

अर्जेंर्टिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सांगितलं की, बार्सिलोना क्लब सोडणे हे माझ्यासाठी फार कठिण निर्णय होता. परंतु, फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मनशी जोडला गेल्यानंतर मी आनंदी आहे.

मेस्सी बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाला की, बार्सिलोनामधून बाहेर पडणे हा मोठा कठीण निर्णय होता. पण मी जेव्हा पॅरिसला पोहोचलो. तेव्हा मला आनंद झाला. पहिल्या मिनिटापासून पॅरिसमध्ये मी माझा वेळ एन्जॉय करत आहे. मी खरचं भाग्यशाली आहे की, कराराच्या जटील गोष्टी सोप्या झाल्या. मला वाटतं की, आता हा क्लब प्रत्येक विजेतेपदाच्या लढ्यासाठी तयार आहे.

पीएसजीसोबत जोडला गेल्यानंतर मेसीने आनंद व्यक्त करत येथील संघ अविश्वसनीय असल्याचे म्हटलं. हा अनुभव माझ्यासाठी खास असणार असल्याचे देखील मेस्सीने सांगितलं.

दरम्यान मेस्सी पीएसजी क्लबकडून मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. याविषयी तो म्हणाला की, मला कल्पना नाही की मी या क्लबकडून कधी खेळेन कल्पना नाही. परंतु आशा आहे की मी प्री सीझन कंडिशनआधी याची सुरूवात करेन.

दरम्यान, पीएसजी क्लबने मेस्सीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. यात मेस्सीला हा करार तीन वर्षे वाढवण्याची मुबा त्यांनी दिली आहे. मेस्सी क्लबसोबत जोडला गेल्यानंतर पीएसजीने आनंद व्यक्त केला.

दरम्यान, ब-ाझीलचा स्ट्रायकर नेमार याने मंगळवारी मेस्सीसोबतचा एक फोटो इंन्स्टाग-ाम स्टोरीवर पोस्ट केला होता. याला त्याने बॅक टुगेदर, असे कॅप्शन दिले होते. नेमार देखील पीएसजी क्लबकडून खेळतो. याआधी ही जोडी बार्सिलोना क्लबकडून खेळत होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!