टोकियो ऑलिम्पिकने सिद्ध केलं की डब्ल्यूएचओचा सल्ला योग्य ठरला – आयओसी सल्लागार
अंतरराष्ट्रीय प्रतिनिधि,
कोरोना महामारीच्या सावटाखाली देखील टोकियो ऑलिम्पिक यशस्वीपणे पार पडलं. टोकियो 2020 इंडिपेंडेंट एक्सपर्ट पॅनलचे अध्यक्ष ब-ायन मॅकक्लोस्की यांनी ऑलिम्पिक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी संपलेल्या ऑलिम्पिकचा निकर्ष पाहता, डब्ल्यूएचओचा सल्ला हा ऐतिहासिक मार्गाने योग्य ठरल्याचे म्हटलं आहे.
मॅकक्लोस्की म्हणाले की, साथीच्या आजारातून बाहेर पडण्याचा एकमात्र मार्ग आरोग्य आणि सामाजिक उपाय लागू करणेच आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सतत हात धुत राहणे, हाच उपाय आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने महामारीच्या सुरूवातीपासून भर दिला.
चाचण्या तसेच ट्रॅक अँड आणि ट्रेस प्रोग-ाम हेच डब्ल्यूएचओचे सुरूवातीपासून मत राहिल्याचे देखील मॅकक्लोस्की म्हणाले.
टोकियोत डब्ल्यूएचओच्या सल्ल्यानुसार टोकियोत हाच प्रोग-ाम आखण्यात आला. याचे निष्कर्ष पाहता डब्ल्यूएचओचा सल्ला योग्य ठरल्याचे दिसून येतं. मूलभूत उपायांचे पालन आणि चाचणीसह प्रोटोकॉल पाळत साथीच्या आजाराना दूर ठेवता येणे शक्य आहे. हे आम्ही दाखवून दिले असल्याचे मॅकक्लोस्की म्हणाले.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये 1 जुलैपासून ते 7 ऑगस्टपर्यंत 6 लाख 51 हजार 296 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. याशिवाय स्थानिक प्रशासनाने टोकियो विमानतळावर 42 हजार 711 चाचण्या घेतल्या. अद्याप याचा अंतिम आकडा येणे बाकी आहे.
या दरम्यान, 1 जुलै ते ऑलिम्पिकसंपेपर्यंत पॉझिटिव्हिटी दर 0.02 इतका होता. इतकेच नाही तर विमानतळावर कोविड-19 अर्ली डिटेक्शन सिस्टम योजनेनुसार काम करण्यात आलं. यात केवळ पॉझिटिव्ह दर फक्त 0.09 टक्के असल्याचे समोर आलं आहे.