पेंटागॉन बाहेर गोळीबाराची घटना, एका अधिकार्‍यांचा मृत्यू तर आरोपी ठार

वॉशिंग्टन डी.सी

4 ऑगस्ट

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. पेंटागनजवळील एका सब-वे स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. परिसरात हल्लेखोर सक्रिय असल्याची माहिती मिळताच लॉकडाऊन करण्यात आलं होतं. हल्लेखोराने चाकूने वार केल्यानंतर एका अधिकार्‍याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी संशयित आरोपीला ठार केल्याचे वृत्त आहे. परिसरात तणाव निर्माण झाला असून लोकांना नागरिकांना दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्लिंग्टन काउंटी फायर डिपार्टमेंटनुसार अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट नाही, की गोळी लागल्यामुळेच दाखल केले आहे. ही घटना मेट्रो बस प्लेटफार्मवर झाल्याचे पेंटागॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीने सांगितले. ही जागा अर्लिंग्टन काउंटीमध्ये आहे. वृत्तसंस्थेच्या पत्रकारने पोलिसांना ’शूटर’ बोलताना ऐकल्याची माहिती आहे.

फेअरफॅक्स काउंटी पोलीस विभागानेही टिवटरद्वारे अधिकार्‍याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ऑॅस्टिन विल्यम लान्झ (27) अशी आरोपीची ओळख पटली आहे. तर त्याने हल्ला का केला, याचे कारण अद्याप पोलीस शोधत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती पोलीस अधिकार्‍याने दिली. ऑॅस्टिन विल्यम लान्झवर घरफोडीचे आरोप आहेत. तसेच अतिरिक्त आरोपांसह एक स्वतंत्र फौजदारी खटला दाखल आहे.

यापूर्वी 2010 ला पेंटागॉनमध्ये अशीच एक घटना घडली होती. पेंटागॉनच्या बाहेर एका बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला होता. या घटनेनंतर पेंटागॉन किमान एक तास बंद होते. गोळीबाराला रोखताना अधिकारी गंभीर जखमी झाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!