ट्रम्प यांना मिळत असलेल्या राजकीय देणग्यांमुळे विरोधक चिंतेत
नवी दिल्ली प्रतिनिधी
4 ऑॅगस्ट
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची वाढत चाललेली संख्या आणि त्यांना मिळत असलेल्या राजकीय देणग्यांचे आकडे यामुळे ट्रम्प यांचे विरोधक चिंतेत पडले आहेत. ताज्या बातमीनुसार गेल्या 6 महिन्यात ट्रम्प यांच्या समर्थकांनी 10 कोटी डॉलर्स देणगी म्हणून दिले असून त्यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता वाढत असल्याचे पुरावेच मिळाले आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदावर दावा करू शकतात असे मानले जात आहे.
टीव्ही वाहिनी सीएनएनने केलेल्या विेषणानुसार ट्रम्प याना मिळत असलेल्या राजकीय देणग्या आगामी काळात आणखी वाढतील. ट्रम्प यांना ज्या प्रमाणात देणग्या मिळत आहेत त्यावरून कॅपिटल हिंसा प्रकरणाचा ट्रम्प याच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही असे दिसून येत आहे. 2024 मध्ये यामुळेच ट्रम्प पुन्हा उमेदवारी जाहीर करू शकतील.
जनमत सर्व्हेक्षणातून मिळालेल्या संकेतानुसार ट्रम्प समर्थकांना ट्रम्प यांचा पराभव म्हणजे निकालात गडबड करून लागलेला निर्णय अशी खात्री वाटते आहे. या समर्थकांना खुश करण्यासाठी ज्या ज्या राज्यात रिपब्लिकन सत्तेत आहेत तेथे नवीन निवडणूक नियम लागू केले गेले आहेत. त्यानुसार अल्पसंख्यांक आणि अश्वेतांना मतदान करणे अवघड झाले आहे. ट्रम्प समर्थक राजकीय संघेटनेकडे 10 कोटी 20 लाख डॉलर्सचा कोश आहे. त्या जोरावर ते अन्य राज्यातील निवडणूक निकालांवर प्रभाव पाडू शकतात असे मानले जात आहे. सध्याचे अध्यक्ष जो बायडेन याच्यापुढे ट्रम्प यांचे मोठेच आव्हान असेल असे म्हटले जात आहे.