पाकिस्तान पंतप्रधान निवास भाड्याने देणे आहे

कराची प्रतिनिधी

4 ऑॅगस्ट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला असून देशाला बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ज्या उपाययोजना आखल्या जात आहेत त्याचा हा एक भाग आहे. पाकिस्तान पंतप्रधानांचे इस्लामाबाद येथील अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्याचा हा निर्णय आहे. पंतप्रधान इम्रान खान 2019 पासून या निवासस्थानात राहत नाहीत तर ते स्वत:चा घरी ‘बानी गाला आवास’ येथे राहतात. 2019 मध्येच इम्रान खान यांनी पंतप्रधान निवासस्थान विश्वविद्यालयात रुपांतरीत केले जाईल अशी घोषणा केली होती पण ते होऊ शकलेले नाही.

इम्रानखान सरकारी म्हणता येईल अशा, फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करत आहेत. त्यामुळे अधिकृत पंतप्रधान निवासस्थान शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो अथवा अन्य कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाणार आहे. पूर्ण इमारतीऐवजी ज्यांना हवे त्यांना फक्त लॉन, गेस्टरूम सुद्धा भाड्याने मिळणार आहेत. यासाठी दोन स्वतंत्र कमिटी नेमल्या गेल्या आहेत. पंतप्रधान निवासस्थानाची शिस्त व मर्यादा यांचे उल्लंघन होत नाही हे पाहण्याची जबाबदारी या कमिटीना सांभाळावी लागणार आहे असे समजते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!