उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीवरुन पुन्हा एकदा चर्चेला उधाण
प्योंगप्यांग
3 ऑगस्ट
पुन्हा एकदा उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन चर्चेत आले आहे. किम जोंगचे वजन घटल्यामुळे उत्तर कोरियात काही दिवसांपूर्वी चिंतेचे वातावरण पसरले होते. उत्तर कोरियातील नागरिक त्याच्या तब्येतीमुळे चिंतातूर झाले होते. किम जोंग उन यांचे वजन तब्बल 20 किलो कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. दरम्यान दक्षिण कोरियाच्या नेत्याने गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले होते. पण आता पुन्हा किम जोंग उन एकदा त्यांच्या तब्येतीवरुन चर्चेत आले आहेत.
आपल्या कठोर निर्णय, अमेरिकेला विरोध आणि त्याच्या खास शैलीसाठी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या छोट्या छोट्या कृतींकडेही जगाचे बारीक लक्ष असते. त्याच्यावर जगभरातील गुप्तचर संस्था नजर ठेवूनच असतात. अलीकडच्या काही दिवसांत किम जोंग उनच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असलेल्या पट्टीवर सध्या चर्चा सुरु आहे.
वास्तविक, काही दिवसांपासून सार्वजनिक आणि माध्यमांपासून किम जोंग दूर होते आणि जेव्हा ते परतले, तेव्हा त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक मलमपट्टी दिसली. या पट्टीमुळे जिथे उत्तर कोरियाच्या लोकांमध्ये किम जोंगच्या आरोग्याविषयी चिंता निर्माण होत आहे, तिथे परदेशी गुप्तचर संस्था या पट्टीचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
एनके न्यूज साईट आणि चोसुन इल्बो वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, किम जोंग 24 जुलै ते 27 जुलै दरम्यान, कोरियन पीपल्स आर्मीच्या एका कार्यक्रमात दिसले होते. जिथे त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक मलमपट्टी दिसत होती. पण, नंतर ती पट्टी सरकारी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही चित्रांमध्ये दिसत नाही. किम त्यांचे केस कानापर्यंत कापतात, ज्यामुळे त्यांच्या डोक्याच्या आसपास झालेले कोणतेही बदल सहज दिसू शकतात.
किम जोंग हे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आहेत. गेल्या काही वर्षांपासून 37 वर्षीय किम जोंग आजारी आहेत. पण, त्याच्या आजाराबद्दल कोणालाही कल्पना नाही. किम जोंग धूम-पान देखील करतात, असे म्हटले जाते. ते यापूर्वी 2014 मध्ये सहा आठवड्यांपासून लोकांच्या नजरेपासून गायब होते. नंतर जेव्हा ते समोर आले, तेव्हा ते छडी घेऊन चालत होते, ज्यामुळे त्यांना गंभीर आजाराने ग-ासले असावे असा अंदाज लावण्यात आला होता.