फैजपूरचे प्रांतअधिकारी कडलग यांनी घेतली मंडळ अधिकाऱ्यांची बैठक
फैजपूर- ( प्रमोद कोंडे.9922358586 )
रावेर, यावल तालुक्यातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांची आढावा बैठक फैजपूरचे प्रांतअधिकारी कैलास कडलग यांनी घेतली.प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अवैध गौणखनिज प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पिक पेरा नोंदणी करावी, असे आवाहन करत आतापर्यंतच्या नोंदणीचा आढावा घेतला.
थकबाकी वसुली, तुकडे बंदी प्रकरणे शोधून त्याचा नजराणा भरून नियमित करणे, वापरात बदलचे प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या आढावा बैठकीस यावेळी उपस्थित शेखर तडवी,जी. एन. शेलकर,जे. डी. भंगाळे, रशीद तडवी, विठोबा पाटील, सचिन पाटील, मिलिंद देवरे, पी. ए. कडनोर, बबिता चौधरी, होते.