एरंडोल येथील एसटी डेपो वाहक चालक कर्मचारी उपोषणाला राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून पाठिंबा..
एरंडोल प्रतिनिधी –
एरंडोल शहरात आज रोजी वार मंगळवार दिनांक 23 रोजी उत्तर महाराष्ट्र संघटक मंत्री डॉ पडशीकर व जिल्हा उपाध्यक्ष संतोष वजरी व तालुका अध्यक्ष राजु चौधरी राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून एरंडोल येथील एसटी डेपो वाहक चालक कर्मचारी यांच्या उपोषणा च्या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा तालुका चे राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला तसेच राज्य शासनाकडे एसटी डेपो कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात पक्षाचे व्यवस्थापक माजी कॅबिनेट मंत्री माधव जी जानकर साहेब यांना तालुकाध्यक्ष राजू चौधरी यांनी फोन लावून एरंडोल एसटी डेपो चे वाहक मोरांकर साहेब यांनी साहेबांना फोनवर विनंती करण्यात आली साहेब आमच्या मागण्या आपल्या पक्षाकडून व आपण स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार परिवहन मंत्री माननीय साहेब यांना आपल्या पक्षाचे लेटरपॅड व आपल्या सहीने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाला पाठवून पाठपुरावा करून मंजूर करण्यात याव्या अशी साहेबांना फोन वर विनंती करण्यात आली व तसेच माननीय जाणकार साहेबांनी आम्हाला पुर्ण आश्वासन दिले दिले व महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या तुम्हाला पूर्ण पाठींबा राहील.