मैत्री सेवा फाउंडेशन च्या राखी कर्तव्याची या उपक्रमाला देशाच्या सीमेवरील जवानांचा ही उस्फूर्त प्रतिसाद…. !!
दैनिक महाराष्ट्र सारथी एरंडोल प्रतिनिधी प्रमोद चौधरी
अचानक थेट बॉर्डर वरून फोन
एरंडोल -रक्षाबंधनाच्या शुभ दिवसावर
२५ते ३० महिला बहिणींना थेट बॉर्डर वरून रक्षाबंधनाचा फोन आला.व जवानांनी देखील सांगितले मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे आयोजित राखी कर्तव्याची या उपक्रमाअंतर्गर आमच्यापर्यंत राखी पोहोचले असून आम्ही आपण दिलेले पत्र देखील वाचले व आम्ही त्या राखी बांधून घेतल्या व तुम्ही पाठवलेल्या राख्या बद्दल बहिणींनो आपले खूप खूप आभार ..
भावान कडून बहिणीच्या रक्षणाचे वचन
आम्ही बॉर्डर वर असल्यामुळे क्षमा असावी आम्ही आपल्याला कोणतेही गिफ्ट नाही देऊ शकत पण भारताच्या रक्षणा सोबतच आपले देखील रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे हेच , आपल्या राखी आणि प्रेमपूर्वक पत्रामुळे आम्हाला आमचे कर्तव्य बजावण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली , जवानांकडून बऱ्याच महिलांना कृतज्ञतापूर्वक फोन करण्यात आले.
राखी कर्तव्याची
जवानांनी राखी बांधतांनाचे आपले फोटो देखील पाठवले आहेत. या उपक्रमातील राख्या मैत्री सेवा फाउंडेशने जवानांसाठी राखी मेजर विजय पाटील यांच्या हस्ते शिमला (हिमाचल प्रदेश) व जम्मू , काश्मीर येथे पोहचवण्यात आले. नौ सेनेच्या जवानांसाठी कोची (केरळ) येथील युनिटसाठी नेव्ही ऑफीसर अमितसिंग राजपूत यांच्या तर्फे पाठवण्यात आले . आपल्या एरंडोल शहरातील सर्व महिला मंडळ व माता-भगिनीं मुळे हा उपक्रम यशस्वी झाला , त्यामुळे सर्व महिला बहिणींचे खूप खूप आभार व जवानांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांच्या देखील आभार….