जागतिक पर्यावरण दिना निमित्त व मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जळगाव महानगर तर्फे, ५५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव वार्ताहर
जळगाव शहरातील गणेशवाडी, मुख्य पोस्ट ऑफिस, तुकारामवाडी परिसरात गुलमोहर, कडू निंब, अशोका, आवळा शीसम, सप्तपरणी , आंबा, इत्यादी प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. वृक्षांना सुरक्षेच्या दृष्टीने तारेची जाळी सुद्धा लावण्यात आली.
सदर वृक्षरोपण हे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त व मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, युवासंघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्जुन भारुळे, प्रीतम शिंदे, तुषार दापोरेकर, गोकुळ बारी, अमोल गोपाळ, सुरेश पाटील, रवींद्र सपकाळे, उमाकांत जाधव, पियुष हसवाल, पियुष तिवारी , प्रशांत वाणी, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, इत्यादी उपस्थित होते.