अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र- पर्यावरण प्रकृती विभाग ,व संत सावता नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी
आज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र पर्यावरण प्रकृती विभाग ,व संत सावता नगर परिसरात
जेस्ट नागरिक ,व बालगोपाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
ह्यावेळी ,निंब रेंट्री बकुळ सिसम आदी वृक्ष लागवड करण्यात आली.
जळगाव जिल्हा पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील यांनी पर्यावरणाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कर्तव्यदक्ष नागरिक म्हुणुन वृक्षारोपण करणे आपली जबाबदारीच आहे पण त्या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा आपलं दायित्व आहे. पर्यावरण वाचवा, वृक्ष लागवड करा, अशी समाजात जनजागृती करायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. खरतर हि एक दुर्दैवाचीच बाब आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर पृथ्वी नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणजे सजीव सृष्टीचं संपेल हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण लक्ष देत नाहीत या गोष्टीसाठी जनजागृती करावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे,
आपल्याला जर आपली सजीव सृष्टीचं संगोपन करणारी हवी असेल तर आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण वृक्षारोपण करतो पण कोणते वृक्ष किंवा रोप आपण कुठे लावायला हवे हे आपण समजून घेतले पाहिजे.
पावसाळा हा वृक्षारोपणासाठी योग्य काळ समजला जातो. पण वृक्ष लावताना योग्य झाडांची निवड केली पाहिजे. वड, पिंपळसारख्या वृक्षांमध्ये प्रदूषण कमी करण्याची व हवा स्वच्छ करण्याची भरपूर ताकद आहे. उन्हाळ्यात थंडावा वाटतो. मंदिराच्या परिसरात बेल, गुलमोहर, जास्वंद, प्राजक्त हि झाडे लावावीत. मोकळ्या जागांवर मेहंदी, हिरडा, बेहडा, आवळा, अडुळसा, हि झाडे लावावी.
सदर कार्यक्रमाला श्री पुंडलिक देवचंद पाटील ,श्री उत्तम भाउ सोनवणे,श्री राजेंद्र बडगुजर, श्री बोडडे दादा ,श्री किरण पाटील सर श्री चंद्रशेखर पाटील , श्री जगदीश महाले ,वसंत पाटील पर्यावरण प्रतिनिधी जळगाव यांचे सहकार्य लाभले.