कॉफी विथ करणचा नवा सीझन येणार?
मुंबई प्रतिनिधी
17 जून
धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. तो आपल्या सोशल मीडीयाावरून नेहमी आपण काय करतोय याची माहिती देत असतो. सध्या करण जोहरची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. कारण, करणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोमुळे आणखी एक नवी कुणकुण नेटकर्यांना लागली आहे, ती म्हणजे, करण जोहर कॉफी विथ करणचा नवा सीझन आणणार का याची.
कॉफी विथ करणमधून करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. तो या शोमध्ये कलाकारांना बोलावतो आणि त्यांची मुलाखत घेतो. या मुलाखतीतून इंडस्ट्रीतली गॉसिप्स समोर येतात. करणचा हा शो खूपच गाजला म्हणूनच त्याने कॉफी विथ करणचे एक दोन नव्हे, तर तब्बल सहा सीझन आणले. आता करण जोहर नव्या सीझनची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. करण जोहरने इन्स्टावरून ही माहिती दिल्यामुळे नेटकर्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे.
आपल्या इन्स्टा पोस्टवर करण जोहरने करण ऑॅन कॉफी..सीझन? अंसं सांगणारा फोटो पोस्ट केला आहे. करण जोहरच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा नव्या वादांना सुरूवात होणार असं दिसू लागलं आहे. करण जोहरने मधल्या काळात बॉलिवूड वाईव्ज असा नवा शो केला होता त्यात तो कलाकारांच्या पत्नींना बोलावून त्यांच्याकडून गॉसिप काढून घेत असे. पण हा शो तितका चालला नाही. या शोच्या नावावरून मधूर भंडारकर आणि त्याच्यामध्ये वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा करणने आपलं कॉफीचं अस्त्र बाहेर काढलं आहे.
करण जोहर गेल्या वर्षापासून सोशल मीडियावर कमी व्यक्त होत होता. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवू़मध्ये नेपोटिझमची चर्चा जोरात झाली होती. इतकंच नव्हे, तर कंगना रनोतपासून अनेकांनी करण जोहर, आदित्य चोप्रा यांच्यावर नेपोटिझमचा आरोप केला होता. सुशांतच्या मृत्यूलाही हे बडे बॅनर जबाबदार असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर मात्र करण जोहर सोशल मीडियावर बोलायचा कमी झाला होता. त्याच्या कंपनीच्या पदाधिकार्यालाही पोलिसांनी चौकशीला बोलावलं होतं. आता सुशांत गेल्यानंतर एक वर्ष उलटून गेल्यावर पुन्हा एकदा करण नवं काहीतरी घेऊन येताना दिसतो आहे.