ठरलंष्ठ! पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार दीपिका-ॠतिक
मुंबई,
पहिल्यांदाच दीपिका पादुकोण आणि ॠतिक रोशन दोघेही चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या आगामी चित्रपटात दोघेही स्क्रिन शेअर करणार आहेत. 26 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज केला जाणार असल्याचे सांगितले जात होते.
यापूर्वीच ‘फायटर’चे चित्रिकरण सुरु झाले असून दीपिका आणि ॠतिकची ऑॅन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. ॠतिकने काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.
इन्स्टाग-ामवर ॠतिकने शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भातील माहिती वायकॉम 18 स्टुडियोचे प्रोड्यूसर अजीत अंधेरेनं एक टवीट करत दिली. त्यांनी आपल्या टवीटमध्ये म्हटले आहे की, तयार राहा 2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारताचा पहिला वहिला हवाई अॅक्शनपट फायटरसाठी. ॠतिक रोशन आणि दीपिका पादुकोण बॉक्स ऑॅफिसवर येत आहेत.
तर इंस्टाग-ामवर ॠतिक रोशनने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ॠतिकसोबत दीपिका पादुकोण, दिग्दर्शक सिद्धार्ध आनंदही आहेत. हा फोटो शेअर करत ॠतिकने लिहिले होते की, ही गँग उडण्यासाठी तयार आहे. ञ्च्ऋळसहींशीीङ्घ ॠतिकच्या कमेंटवर अनेक बॉलिवूडकरांनी कमेंट केल्या होत्या. दीपिकानंही ॠतिकच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, हा! जसे आम्ही ते खाणे पचवतो!