गुरु पौर्णिमा निमित्त गुरु श्री श्री रवी शंकरजी महाराज यांच्या आश्रमाच्या आवारात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील- चित्तोड येथे गुरु पौर्णिमा निमित्त गुरु श्री श्री रवी शंकरजी महाराज यांच्या आश्रमाच्या आवारात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री श्री रवी शंकरजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन
धुळे जिल्ह्याचे प्रथम महापौर चंद्रकांत सोनार , व उपमहापौर संतोष महानोर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम स्थानिक नागरिकांच्या हस्ते फुल गुच्छ देऊन संपन्न करण्यात आला.
संतांची शिकवण म्हणजे संस्काराची शिदोरी होय”. भारतातील संतांची वचने ईश्वर भक्ती चा मार्ग असतो. पहिला गुरू आई वडील व बाबा असतात. शिक्षक व मित्र दुसरे गुरू असतात. संत व भक्ताचे नाते गुरू व शिस्य ची जुगलबंदी असावी . संतांची वाणी व शिकवण शिष्यासाठी संस्काराची शिदोरी असते असे मार्गदर्शनपर विचार धुळे जिल्ह्याचे प्रथम महापौर चंद्रकांत सोनार यांनी मांडले .
सत्कार समारंभानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या मध्ये वड, बाभूळ, निम, अशा प्रकारचे ऑक्सिजन देणारे १८० झाडांची लागवड करण्यात आली.
व ते झाड मोठे करण्याची जबाबदारी चितोड मधील नागरिकांनी घेतली.
सदर कार्यक्रमाला नगरसेवक बंटी भाऊ मासुळे, सामाजिक कार्यकर्ते दिपक भाऊ खताळ, राजेंद्र दाभाडे माजी सैनिक (तलाठी) ,खैरणार सर, नानासाहेब वाघ, प्रवीण पवार ( सरपंच),व कार्यकर्ते , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍🏻आपणास कळविण्यात येते की आमच्या दैनिक महाराष्ट्र सारथी
करीता
धुळे जिल्हा भरात व तालुकास्तरावर – ग्रामीण भागाकरीता प्रतिनिधी नेमणे आहे. पत्रकारतेची आवड असलेल्या उमेदवारांनी खालील नंबर वर संपर्क साधावा,
शैलेंद्र ठाकुर
(कार्यकारी – संपादक)
संपर्क व्हाट्सअँप नंबर – 🪀9860085700