जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वक्रतुंड रेसिडेंसी चितोड धुळे येथे मा.उपआयुक्त कोते साहेब सो.लोक नियुक्त सरपंच भीमा आण्णासाहेब यांच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
दैनिक महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी विजय ठाकूर यांचेकडून.
धुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वक्रतुंड रेसिडेंसी चितोड धुळे येथे मा.उपआयुक्त कोते साहेब सो.लोक नियुक्त सरपंच भीमा आण्णासाहेब यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
सरपंच भीमा आण्णासाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कर्तव्यदक्ष नागरिक म्हुणुन वृक्षारोपण करणे आपली जबाबदारीच आहे पण त्या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा आपले कर्तव्य आहे. पर्यावरण वाचवा, वृक्ष लागवड करा, अशी समाजात जनजागृती करायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. खरतर हि एक दुर्दैवाचीच बाब आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर पृथ्वी नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणजे सजीव सृष्टीचं संपेल हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण लक्ष देत नाहीत. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावणे आवश्यक आहे.
सदर कार्यक्रमाला राजेंद्र दाभाडे (माजी सैनिक )तलाठी, आशिष वानखेडे खजिनदार,प्रकाश पवार,अनिल वळवी,बराडे सर,रोहित शिंगारे,स्वप्नील साळवे, व इतर पदाधिकारी यांनी सहकार्य केले.