गोवंश बचावासाठी भाजपचे पोलीस स्टेशनला निवेदन

धरणगाव प्रतिनिधी

दि.०१/०८/२०२१ रोजी धरणगाव पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले की,दि.20-07-21 रोजी बकरी ईद निमित्ताने म.पोलीस निरीक्षक व पोलीस स्टॉप सर्च ऑपरेशन साठी शहरातील कुरेशी मोहल्ला येथे गेले असता त्यांना विना परवाना 20 गोऱ्हे आढळुन आले,म.पोलीस निरीक्षक व स्टॉपने सदरील 20 गोऱ्हे हे धरणगावातील कामधेनू गो शाळेत संगोपनासाठी ठेवण्यात यावे असे लेखी पत्र दिले आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की,सदरील गोऱ्हे हे कत्तलीच्या इराद्याने कुरेशी मोहल्ल्यात आणण्यात आले होते,तरी महोदय आपण या बाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा व पकडण्यात आलेले 20 गोऱ्हे कायमस्वरूपी संगोपनासाठी कामधेनू गो शाळेत ठेवावे असे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी भाजप ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,राजू महाजन,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,शरद भोई,मीडिया प्रमुख टोनी महाजन,युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर,गोरक्षा समितीचे श्रीपाद पांडे,किरण वऱ्हाडे, राहुल बयास,आकाश तिवारी,इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!