कोरोना-19 विरुद्ध लसीकरण एक मजबूत संरक्षणात्मक कवचकुंडल – प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही.पवार

धरणगाव (प्रतिनिधी)-

कोरोना-१९ विरुद्ध लसीकरण एक मजबूत संरक्षणात्मक कवचकुंडल आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांनी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प.रा.हायस्कूल संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार, प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. मयुर जैन, मारोतीराव कल्याणकर, इच्छेश काबरा उपस्थित होते.
पुढे ते असे म्हणाले की, जागतिक पातळीवर भारत असा एक प्रथम देश आहे की ज्याने शंभर करोड लसीकरणाची मोहीम यशस्वी रीतीने राबवली आहे. त्यामुळे मृत्युदर हा कमी झाला. त्यासाठी महाविद्यालयातील अठरा वर्षाच्या पुढील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःहून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य टी.एस.बिराजदार यांनी केले. प्रमुख अभाविप जिल्हा प्रमुख मा.डॉ.सुनील कुलकर्णी, मा डॉ.मयूर जैन यांनी कोव्हिड-१९ ची पार्श्वभूमी विस्तृतपणे मांडली. कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य दादासो दिलीपजी रामू पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुणजी कुलकर्णी, मा. उपाध्यक्ष श्री.व्ही टी. गालापुरे व संचालक मा श्री अजयजी पगारिया यांनी कार्यक्रमास शुभेच्छा कळविल्या. सदर भव्य लसीकरण सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प रा हायस्कूल सोसायटीचे सचिव मा श्री मिलींदजी डहाळे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यास प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजक वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ कांचन महाजन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ दीपक बोंडे ,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ.अरुण वळवी, अभाविप तालुका प्रमुख अक्षय वाणी यांनी केले. उपप्राचार्य मा डॉ किशोर पाटील, प्रा.बी.एल. खोंडे उपप्राचार्य प्रा आर आर पाटील, रासेयो विभागीय समन्वयक प्रा डॉ संजय शिंगाणे यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.प्रवीण बोरसे यांनी केले व आभार उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील यांनी केले .सदर भव्य लसीकरण मोहिमेत २०९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.अभिजित जोशी ,प्रा हर्षल भालेराव ,प्रा डॉ धम्मज्योत गायकवाड ,प्रा डॉ गजानन जाधव, प्रा सौ छाया सुखदाणे,प्रा गौरव महाजन, प्रा अमित पाटील, अभाविपचे शाम भाटिया, आर्यन सैंदाणे, वेंदात भट, हर्षल महाजन, सिध्देश्वर पाटील, प्रथमेश कासार, प्रथमेश भावसार, जैनम डेडीया, मोरेश्वर महाले, विराग चौधरी, विवेक महाले, भुषण तळेराव, यश चौधरी, गौतम महाजन, मयुर मराठे, कृष्णा बडगुजर, अनंता धारणे, रोहित पाटील, प्रथमेश पवार, प्रफुल पाटील, शुभम मराठे, उमाकांत मराठे, आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री राजू चव्हाण ,श्री हेमंत सोनवणे, श्री किरण सुतार, श्री कुमारजी डहाळे , दीपक पाटील व श्री संजय तोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!