माळी,पाटील,तिळवण तेली समाज,व मराठे पंचमंडळ कडून वाहनांची पुजा व आरती..

धरणगाव (प्रतिनिधी)-

येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चा शेवटचा पांडवसभा वाहनांचा पुजा व आरती साठी लहान माळी वाडा येथील माळी समाज, पाटील समाज, तिळवण तेली समाज तसेच क्षत्रिय मराठे समाज या चारही समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळ पंच मंडळ यांना बोलावुन पुजा व आरती करण्याचा मान देण्यात आला
खरं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा अनुषंगाने प्रशासनाने रथ व वहान मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने वाहनांची जागेवर पुजा व आरती रात्री सात वाजता व शेवटची आरती रात्री दहा वाजता करण्यात येते परंतु वाहन व्यवस्थापक मंडळाने पहिल्या दिवसाचा वाहना पासून तर शेवटचा पांडवसभा चे वाहना पर्यंत गावातील प्रतेक समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळा बोलाऊन आरती करण्यात सहभागी करून घेतल्याने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला हे चित्र पाहुन 130वर्षाची परंमपरा असलेल्या ह्या मंडळाने आजही सामाजिक समता एकता व समरसतेचा वारसा जपुन श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ हे सामाजिक एकतेचे प्रतिक असल्याचा चित्र निर्माण झाले असल्याचे संदेश गांव पातळीपासुन जिल्हा पातळीवर पोहचला यांचे खरं श्रेय मंडळाचे अध्यक्ष डी आर पाटील सर, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेद्र पवार, जिर्णध्दार समितीचे जिवन आप्पा बयस, प्रशांत वाणी, किरण वाणी, सह प्रमुख कार्यकारणी सदस्याचे असल्याचे नमुद करावसं वाटतं तर दुसरी कडे सर्व समाजाचा प्रमुख लोकांना बोलाऊन वाहनांची पुजा व आरती मध्ये सहभागी करून घेतल्याने हे मंदीर पुर्ण गावांचा असल्याचा संदेश देखील सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली
आरती प्रसंगी लहान माळी वाडा समाज पंच मंडळ चे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील उपाध्यक्ष दिलीप बापु पाटील, तिळवण तेली समाज चे अध्यक्ष सुनिल चौधरी, मराठे समाज पंच मंडळ चे अध्यक्ष पांडुरंग मराठे, रघुनाथ चौधरी, कडू महाजन, विलास महाजन,शिवसेनेचे शहर प्रमुख राजु महाजन माळी समाजाचे सह सचिव राजेद्र महाजन, सह चारही समाजाचे पंचमंडळ सह असंख्य मान्यवर उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!