धरणगाव तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून मदत जाहीर करा:- भाजपची मागणी
धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.
मागील 8 ते 10 दिवसापासून धरणगाव तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी बंधूंच्या शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.त्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी बांधवाना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. अशा पद्धतीने धरणगाव तालुक्याचे नायब तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.त्याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,शिरीष अप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,जगन महाजन,पुनीलाल अप्पा महाजन,अँड.वसंतराव भोलाने,प्रकाश सोनवणे,सुनील पाटील सर,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,एस. पी.पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले,शरद अण्णा धनगर,गुलाब मराठे,सुनील चौधरी,पिंटू पाटील,कन्हैया रायपूरकर,सचिन पाटील,वासुदेव महाजन,जुलाल भोई,तुकाराम भिल,रवी पाटील,जितेंद्र चौधरी,शुभम चौधरी,समाधान पाटील,प्रदीप महाजन,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
आपण धरणगाव तालुक्यातील बातमी 9420299249 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
हर्षल चौहान
धरणगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक महाराष्ट्र सारथी
मो.9420299249