प्रतिनिधी धरणगाव – हर्षल चौहान.
शहरातील चोपडा- अमळनेर चौफुली जवळ असलेल्या पाटाच्या पुलावर भले मोठे खड्डे पडलेले असुन या ठिकाणी अपघाताला आमंत्रण दिले जात आहे,अनेक दिवसांपासून खड्डे पडलेले असुन सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे,एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. तसेच एरंडोल – जळगांव चौफुली उड्डाणपूला पासुन ते चोपडा- अमळनेर चौफुली पर्यंत रस्त्यावर खड्डे झालेले असुन शहरातुन जाणारा हा मुख्य मार्ग असुन देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष का ? केले जात आहे, रस्त्यांची अशी दुर्दशा झालेली आहे.
योगेश माळी,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस, धरणगाव :- एरंडोल – जळगांव रोड चौफुली येथील उड्डाणपूला पासुन ते चोपडा- अमळनेर चौफुली खोल पाट पर्यंत संपूर्ण रस्त्यावर ठिक ठिकाणी भले मोठे जिवघेणे खड्डे हे पडलेले आहेत,धरणगाव शहरात येण्या जाण्याचा हा प्रमुख मार्ग असुन विषेश राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा यांचा हा मतदारसंघ आहे आणी येथे रस्त्यांची झालेली दुर्दशा ही खुप निंदनीय गोष्ट आहे तरी प्रशासनाने व मंत्री महोदयांनी विषेश लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी.
समाधान महाजन, शेतकरी :- माझा शेतात येण्या जाण्याचा हा मार्ग आहे,आता अचानक माझ्या मोटरसायकल चा खड्ड्यात तोल गेल्याने मी मोटारसायकल वरून पडलो येथे उपस्थितांनी मला लगेच उचलले, सुदैवाने मला काही दुखापत झाली नाही,परंतु काही कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण ? याचे उत्तर मला प्रशासनाने द्यावे.
साहेबराव माळी,हाॅटेल व्यवसायीक/शेतकरी:- चोपडा- अमळनेर चौफुलीवर गिरणा कॅनल यांचा पाटाच्या पुलावर भले मोठे खड्डे काही दिवसांपासून पडलेले आहेत. त्यावर प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेते मंडळी यांचे लक्ष का जात नाही असा प्रश्न आम्हाला पडतो, रोज येथे अपघात होत असतो जवळच माझा हाॅटेल व्यवसाय व शेती आहे मला नेहमी अपघात झालेल्या लोकांना उचलावे लागते काही अनुचित अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने ही समस्या सोडवावी.
संजय धोबी, पंचर दुकानदार :- चोपडा- अमळनेर चौफुली पासुन अवघ्या काही अंतरावर सा.बा.विभाग यांचे कार्यालय आहे,त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे येथुन रोजचे येणे जाणे आहे, परंतु त्यांना हे खड्डे दिसत नाही का? एखाद्याचा जिव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न माझ्या पुढे उपस्थित होतो, समोरच माझे पंचर दुकान दुकान आहे मी रोज येथील येणारे जाणारे लोकांचा त्रास बघतो,काल सुद्धा एक महिला बघीणी ही मोटार सायकल वरून याठिकाणी खाली पडली परंतु तिला गंभीर दुखापत झाली नाही परंतु काही अनर्थ होण्या अगोदर प्रशासनाने ही समस्या मिटवावी.
आपण धरणगाव तालुक्यातील बातमी 9420299249 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
हर्षल चौहान
धरणगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
मो. 9420299249