धरणगाव येथील ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, दोन हजाराची लाच भोवली….
धरणगाव प्रतिनिधी- ( हर्षल चौहान )
धरणगाव – येथील पंचायत समितीच्या ग्रामसेवकासह विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सोमवार रोजी चोपडा येथे लाच स्विकारतांना रंगेहात पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, धरणगाव, रा.गंगूबाई नगर, पारोळा) तसेच कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५,ग्रामसेवक, ग्रामपंचायत, कंडारी बुद्रूक ता.धरणगाव,रा. बोरोले नगर,चोपडा) या दोघांनी तक्रादाराकडून २ हजाराची लाच स्वीकारली.
तक्रारदार हे ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणुन नोकरीस असुन त्यांचे सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेल्याने सदर जादा देण्यात आलेली रक्कमेची परतफेड करणेबाबत तक्रारदार यांना नोटीस देण्यात आल्याने सदर नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषद, जळगाव येथे पाठविण्याच्या मोबदल्यात सुरेश कठाळे आणि कृष्णकांत सपकाळे या दोघांनी प्रत्येकी १ हजार रूपये असे एकुण २,००० रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. तसेच सदर लाचेची रक्कम ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे याने हॉटेल मानसी, चोपडा येथे पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
सदर कारवाई लाचलुचपत विभागाच्या जळगाव पथकातील पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, पोहेकॉ.शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांनी केली.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण धरणगाव तालुक्यातील बातमी 9420299249 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
हर्षल चौहान
धरणगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9420299249