लिटिल ब्लॉसम स्कूल या इंग्रजी शाळेतही संस्कृतच्या संस्कारांची शिदोरी जपावी स्वदेशी वृक्षांचे संवर्धन व संगोपन ही काळाची गरज स्वातंत्र्यदिनी बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पो. नि. अंबादास मोरे यांचे प्रतिपादन.
धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.
इंग्रजी सोबत मराठी, संस्कृत भाषेच्या संस्कारांची शिदोरी जपून आपल्या माणसांबद्दल कृतज्ञता बाळगणे, स्वयंशिस्त असणे, मोठ्यांचा आदर राखणे. तसेच स्वदेशी वृक्षांचे संवर्धन व संगोपन करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन आज स्वातंत्र्यदिनी लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक अंतर राखून आयोजित केलेल्या सत्कार व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी धरणगाव पोलीस स्टेशनचे पो. नि. अंबादास मोरे यांनी प्रतिपादन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. मोरे हे प्रमुख अतिथी होते. गारखेडा चे माजी सैनिक भटू मधुकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोबत धरणगाव कॉलेजच्या प्रा. डॉ. सौ. ज्योती महाजन, पाचोरा येथील डॉ. अतुल सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ चौधरी, लिटिल ब्लॉसम स्कूल चे चेअरमन दीपक जाधव, ज्योती जाधव, संचालक ए.के. पाटील सर,गजानन साठे, जलदुत फाऊंडेशनचे अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व संचालक, शाळेचे प्रिन्सिपल सी के राजू आदींच्या उपस्थितीत सत्कार समारंभ व बालकांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात झाला.
स्वातंत्र्य दिनी आयोजित कार्यक्रमात कु.श्री माळी, कु. सिद्धी सोनार, कु. अर्णव जैन आदींनी उत्कृष्ट देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी वक्तृत्व स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा इत्यादी स्पर्धेत गुण नैपुण्य प्राप्त करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.तसेच शाळेचा मुलांचा प्रमुख हिमांशू किशोर चौधरी व मुलींचा प्रमुख तेजल बापू धनगर याचाही सत्कार करण्यात आला
शाळा व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी विशेष सत्करात कोरनावीर म्हणून लिटिल ब्लॉसम स्कूलच्या सर्वेसर्वा सौ ज्योती जाधव, डॉ.मनोज अमृतकर, डॉ. प्रणाली महाजन यांचा सत्कार केला. तसेच अपंगत्वावर मात करून बी.टेक. ची पदवी घेऊन नामांकित कंपनीत रुजू झाल्याबद्दल हर्षदा पंढरीनाथ पाटील आणि देवश्री महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जलदुत फाउंडेशन या संस्थेचे डॉ. पंकज अमृतकर, डॉक्टर सुजित जैन, डॉक्टर दीपक पाटील, सुनील शहा, नितेश माळी, मनोज महाजन आदी पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल झाडांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या सौ ज्योती जाधव यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण ही काळाची गरज या बाबत संबोधित केले. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमात कोरोना-19 च्या संसर्गाबाबतचे सर्व नियम पाळण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतिभा चौधरी व संदीप देवरे सर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले.