राज्यस्तरीय आयडियल वक्ता चोपडा (जळगाव) 2021 ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर.

कोल्हापूर जिल्यातील आकांक्षा गुरव प्रथम तर जळगाव जिल्ह्यातील हंसिका महाले द्वितीय तर चोपडा येथील अभिलाषा पाटील हिला तृतीय क्रमांक

जळगाव प्रतिनिधी

लॉक डाउन च्या काळात खान्देश टलेंट या प्रसिद्ध यु ट्यूब चॅनल ने असंख्य स्पर्धा आयोजन केले ज्यात ,स्थानिक पातळी , प्रबोधन संमेलन , व्याख्याते मार्गदर्शन ,राज्यस्तरीय , विभाग स्तरीय , खान्देश स्तरीय व दर्जेदार वक्तृत्व स्पर्धा आदींचा समावेश होता . डिजिटल मीडिया च्या माध्यमातून खान्देश टलेंट यु ट्यूब चॅनल ने उतुंग यश मिळवल असून भविष्यात देखील एक वैचारिक चळवळ व अभ्यास या माध्यमातून पुढे आणणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आयडियल वक्ता 2021 वक्तृत्व स्पर्धेत विद्देची महानायिका – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
स्त्री जीवन आणि संघर्षं . आज चा युवक कसा असावा . व माझ्या स्वप्नातील भारत . हे सद्यस्थितीत महत्त्वाचे विषय देण्यात आले होते. सदर स्पर्धेत जळगाव ,धुळे , नंदुरबार , नासिक , कोल्हापूर , भुसावळ , जिल्ह्यातील वक्त्यांनी साहभागी होत , आपल्या अभ्यासू वाणीतून समग्र ज्ञानाचे उत्तम दर्शन घडवले.

बुधवारी निकाल जाहीर झाला असून त्यात
कोल्हापूर येथील आकांक्षा कृष्णात गुरव – प्रथम
जळगाव येथील हंसिका नरेंद्र महाले – द्वितीय
तर चोपडा येथील अभिलाषा नितीन पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला.

तर उत्तेजनार्थ
प्रथम – वृंदा सचिन पाटील .
द्वितीय – कु . मृणाल पंढरीनाथ देसले
तृतीय – निरज तुषार पाटील
चतुर्थ – यज्ञीका तुकाराम पाटील. या स्पर्धकांनी आपली छाप कायम ठेवली.

स्पर्धे साठी चेतन पाटील . जळगाव , नवनित बागले. धुळे ,युवराज सावंत सर .शिंदखेडा. भाईदास सोमवंशी सर .पाचोरा . यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अविनाश जी इंगळे व प्रा नरेंद्र गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

परीक्षण मा .उगलाल शिंदे सर . मा.आर एस पाटील सर. मा .समाधान पाटील सर यांनी केले.

सर्व यशस्वी स्पर्धक वक्त्यांचे आयोजक मा .पी आर पाटील सर .आयडियल इंग्लिश अकॅडमी चोपडा व खान्देश टॅलेंट हेड कमलाकर मोहिते सर व विनोद बीजबीरे यांनी अभिनंदन केले.

येत्या काळात नवनवीन अभ्यास तंत्र व स्पर्धा खान्देश विभागात व महाराष्ट्रातील सर्व अपेक्षित वयोगटा पर्यन्त पोहचवनार असल्याचे सतिश शिंदे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!