धरणगांव लाडशाखीय वाणी समाज मंडळाची नुतन कार्यकारीणी जाहीर

धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.

धरणगाव लाड शाखीय वाणी समाज मंडळाची सभा नुकतीच वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी मा.श्री.विलास पंढरीनाथ येवले यांची निवड करण्यात आली.या नंतर कार्यकारी मंडळातुन उपाध्यक्ष पदी मा.श्री.चंद्रशेखर लक्ष्मण मुसळे सर व तसेच सचिव पदी श्री.सुधाकर नामदेव वाणी यांची चौथ्यांदा फेर निवड करण्यात आली व श्री.प्रशांत श्रीराम केले यांची सहसचिव, श्री.प्रविण तुकाराम कुडे यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
तसेच श्री.संजय विठ्ठल मालपुरे,श्री.मुकुंद एकनाथ बागड, नगरसेवक श्री.ललित बाळकृष्ण येवले,श्री.सुधीर मधुकर पितृभक्त,श्री.अनिल गणपत मेणे,श्री.प्रशांत दत्तात्रय येवले यांची संचालक पदी व श्री.विशाल विनायक अमृतकर यांची प्रसिद्धी प्रमुख पदी आणि श्री.पदमाकर हरीभाऊ येवले,श्री.किशोर विठ्ठल मुसळे,श्री.अविनाश सुभाष मालपुरे, यांची सल्लागार पदी निवड करण्यात अाली.या प्रसंगी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव,खजिनदार संचालक, सल्लागार यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!