श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष पदी भानुदास विसावे यांची फेर निवड

धरणगाव प्रतिनिधी- हर्षल चौहान.

धरणगाव येथील व्यायाम प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाली, त्यामध्ये विद्यार्थी दशेत असताना महाराष्ट्र चॅम्पियन्स, हल्ली अखिल भारतीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास शंकर विसावे यांची धरणगाव व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड एक मताने करण्यात आली, तसेच मंडळाचे उपाध्यक्षपदी मंगलदास भाटीया, सचिवपदी प्रशांत वाणी, सह सचिवपदी विलास येवले, खजिनदारपदी कमलेश तिवारी यांची सुद्धा पाच वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली. त्यांचा सत्कार जेष्ठ संचालक डॉ व्हि आर तिवारी, गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी, जिवन बयस यांचा शुभ हस्ते करण्यात आला.
सर्व प्रथम वर्ष भरात मंडळाचे संचालक,तसेच करोना मधे, सीमेवर लढतांना, साहित्यीक, लेखक, कवी, ज्ञात, अज्ञात जे जे मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविक नवनिर्वाचित भानुदास विसावे यांनी करीत असतांना कोरोना चे नियम असतांना कुस्ती होणार नसतील तर काही सामाजिक उपक्रम राबवने , धरणगाव शहराचे ग्राम दैवत मरीआईची पुजा, मंडळाची शिल्लक तसेच या व्यतिरिक्त विविध विषयांवर मनोगत व्यक्त करण्यात आले. सचिव प्रशांत वाणी यांनी जमा खर्च वाचुन दाखवला त्याला सर्व सभासदांनी मंजुरी दिली.
सध्या सुरू असलेल्या टोकियो अॅलम्पीक सर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा अभिनंदन चा ठराव सह सचिव विलास येवले यांनी मांडला.
तसेच मंडळाचे संचालक विविध राजकीय व सामाजा चा विविध पदावर नियुक्ती झाली म्हणून गुलाबराव वाघ, जिवन बयस, विलास येवले, प्रकाश पाटील, सुनील चौधरी, प्रशांत वाणी, तसेच डॉ व्हि आर तिवारी यांचा कोरोना योद्धा म्हणून व्यायाम प्रसारक मंडळाचा तर्फे सत्कार करण्यात आला, या बैठकीला मंडळाचे संचालक ज्ञानेश्वर महाजन,प्रकाश पाटील, देविदास महाजन, भास्कर मराठे, सुनील चौधरी,शरद भोई, रवीद्र भोई, बाळकृष्ण येवले , गुरू पैलवान आदी उपस्थित होते
बैठक यशस्वीपणे पार पाडावी म्हणून किरण वाणी, किशोर वाणी, किशोर महाजन, गोपाल पाटील यांनी परीश्रम घेतले, आभार प्रदर्शन कमलेश तिवारी यांनी केले .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!