धरणगाव तालुक्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे नविन पदाधिकारी नियुक्त

धरणगाव प्रतिनिधी- हर्षल चौहान.

जळगाव येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची जिल्हास्तरीय बैठक केमिस्ट भवनात संपन्न झाली. सदरील बैठकीत विहिंपचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बारी व बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष राकेश लोहार यांनी माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली.त्यात धरणगाव तालुक्यातील विश्व हिंदू परिषदच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी श्रीपाद पांडे यांची तर तालुकाउपाध्यक्ष म्हणून हेमंत महाजन यांनी निवड जिल्हाध्यक्ष श्रीराम बारी यांनी केली. बजरंग दलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रथम सूर्यवंशी तर तालुकाध्यक्षपदी आकर्ष तिवारी यांची निवड जिल्हाध्यक्ष राकेश लोहार यांनी केली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!