धरणगांव तालुका अधिकृत पत्रकार संघाची स्थापना
धरणगाव प्रतिनिधी – हर्षल चौहान.
धरणगांव तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत सोमवार रोजी धरणगांव तालुका अधिकृत पत्रकार संघाची स्थापना केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील आम्हा पत्रकारांची कोणतीही अधिकृत पत्रकार संघटना नसल्याने तालुक्यात पत्रकारांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत नसल्याने पत्रकारांचे संघटन दिसून येत नव्हते. तसेच, पत्रकारांची समस्या, विविध योजना देखील पत्रकारांना मिळत नसल्याने अनेक पत्रकारांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने गेल्या कित्येक कालावधी पासून असलेली अधिकृत पत्रकार संघाची मागणी आज सर्व पत्रकारांच्या वतीने पूर्ण करीत धरणगांव तालुका अधिकृत पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली.
सदर पत्रकार संघ पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी व नवीन पत्रकारांना एक विचारपीठ म्हणून कार्यरत असेल तसेच, आमच्या या अधिकृत पत्रकार संघटनेत कोणताही पत्रकार समाविष्ट होवू शकतो. आम्ही सर्व पत्रकारांचे स्वागत करतो. तसेच पत्रकारांच्या एकत्रीकरणासाठी आम्ही सदैव कटी बद्ध राहू असे प्रतिपादन यावेळी जेष्ठ पत्रकार अँड.वसंतराव भोलाणे यांनी व्यक्त केले.
तसेच, धरणगाव पोलिस स्थानका मार्फत पत्रकारांना माहिती देण्यात अथवा प्रेस नोट देण्यात सहकार्य करण्यात येत नसल्याने सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांनी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली. यावर पोलिस प्रशासन सदैव सर्व पत्रकारांसाठी तत्पर कार्यरत राहील असे आश्वासन श्री.मोरे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी धरणगांव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे साईमतचे जिल्हा प्रतिनिधी अँड.वसंतराव भोलाणे, पुण्यनगरीचे भगीरथ माळी, लोकमतचे आर.डी.महाजन, लक्ष्मण माळी, पुण्यप्रतापचे आबासाहेब राजेंद्र वाघ, लोकनायकचे जितेंद्र महाजन, योगेश पाटील, धनराज पाटील, लोकबातमीदार चे निलेश पवार, लोकपत्रिकाचे किरण चव्हाण, पी.डी. पाटील, लाईव्ह ट्रेंडचे विजय पाटील, लोकशाहीचे विनोद रोकडे, सामनाचे बाळासाहेब जाधव, साईमतचे हाजी इब्राहीम, कमलाकर पाटील, अनमोल मत साप्ताहिक/दैनिक महाराष्ट्र सारथी चे हर्षल चव्हाण, बुलंद पोलिस टाईमचे योगेश पी.पाटील, बाळकडू चे प्रा.मंगेश पाटील, महाराष्ट्र न्युज चे सतिष शिंदे, राजेंद्र बाविस्कर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.