दमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील
धामोडी, तालुका रावेर जिल्हा जळगाव – ( दिपक मनोहर जैन -मो. ८८०६६५६५०८ )
आमदार चंद्रकांत भाऊ पाटील
भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख ते आमदार
कुठलाही राजकीय वारसा नसताना जळगाव सह भुसावळ रावेर मुक्ताईनगर बोदवड जामनेर जनसामान्य जनतेला लाभलेलं आपलंसं नेतृत्व.
आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना जनता प्रेमाने चंदुभाऊ म्हणते. चंदुभाऊंचा राजकीय प्रवास फार खडतर आहे
स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेशी जोडला गेलेला हा तरुण मुक्ताईनगर चा शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो.
जनतेच्या अडचणीवर आंदोलने करतो. जिल्हा परिषद ला उभा रहातो आणि निवडून ही येतो आणि
मग सुरू होतो चंदुभाऊंचा खरा राजकीय आक्रमकता प्रवास
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांच्या लढाऊ बाण्याला साथ देतात
त्यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देऊन आणखी बळ देतात
२०१४ ला योगायोग म्हणुन युती तुटते शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवते
मातोश्री वरून चंदुभाऊ ला निरोप येतो
चंद्रकांत कर तयारी मी येतोय प्रचाराला
उध्दव ठाकरे यांची सभा आणि मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील शिवसैनिकांच्या जोरावर चंदुभाऊ विधानसभा निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरतात
निकालाच्या दिवशी थोडक्या मंतानी चंदुभाऊ चा पराभव होतो.
पण पराभवाने न खचता ते मतदार संघात आणखी जोमाने कामाला लागतात कारण त्यांना ठाऊक होते आज थोडक्यात झालेला परभवाचा वचपा ते नक्कीच काढतील थांबुन चालणार नाही हे त्यांनी हेरले आणि २०१९ च्या निवडणुकीची तयारी चालू केली.
२०१९ विधानसभा निवडणुकी आधी लोकसभेची पण तयारी होती
पण परत युती झाल्याने पक्ष आदेशाची वाट होती युती झाल्याने लोकसभेत भ्रमनिरास झाल्यानं
विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत माघार नाही हे मनोमन ठरवून राजकीय डाव सुरू केला
युती असल्याने पक्ष टिकीट मिळणं कठीण होते हे लक्षात घेऊन अपक्ष तयारी केली सोबत
भाजप शिवसेना युती चे टिकीट कुणाला ही प्रतिक्षा ही केली पण अखेर युती चे हे टिकीट भाजप च्या वाटणी ला गेले.,
तयारी तर केलीच होती माघार शक्य नव्हते शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मातोश्री पाठवून हा गडी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उभा ठाकला
आणि शेवटी निकाल लागला चंदूभाऊ आमदार झाले कार्यकर्ते तर आनंद अश्रू काढु लागले मेहनत यशस्वी झाली
शिवसैनिक तर फार आनंदीत झाला
एक सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झाला.
भारतीय विद्यार्थी सेना ते आमदार हा खडतर प्रवास यशस्वी झाला.
चंदुभाऊ थोडक्या मंतानी विजयी झाले. विजयी पताका घेऊन थेट मातोश्री गाठली आणि ज्या शिवसेनेने घडवलं त्या शिवसेनेचे आशिर्वाद घ्यायला मातोश्री वर गेले
उध्दव ठाकरे यांनी आपला चंदु आमदार झाला म्हणत अंलीगन देऊन मिठीत घेत आशिर्वाद दिले. आजच्या घडीला मतदार संघात विकासाची भरमसाठ कामे होत आहेत.
शिवसेना हे नाव रावेर मुक्ताईनगर भुसावळ जामनेर बोदवड या तालुक्यात जिवंत ठेवणार्या चंदुभाऊ ला शिवसेना कशी विसरेन.
नंतर परत मातोश्री वरून पक्ष नियुक्त्या झाल्या त्यात आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना
परत शिवसेनेनं शिवसेना जिल्हा प्रमुख पद बहाल केले.
चंदुभाऊ पुन्हा शिवसेना जिल्हा प्रमुख झाले
जरी शिवसेना जिल्हा प्रमुख असले तरी महाआघाडी सरकार चे आमदार आहेत महाआघाडी आमदार म्हणून सर्व घटकांना ते सोबत घेऊन चालत आहे.
आज १४ सप्टेंबर आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ईश्वर त्यांना पुढील राजकीय जीवनात यशस्वी करो हीच प्रार्थना करतो.
लेखक – दीपक मनोहर जैन