धामोडी येथे लसीकरणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

धामोडी प्रतिनिधी – ( राहुल जैन mob.-8390382664 )

धामोडी येथिल आरोग्य उपकेंद्रावर कोविड १९ चे जवळजवळ ३०० डोस उपलब्ध झाले होते .त्यासाठी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते कोरोना लसीकरणाची पहिला व दुसऱ्या डोस साठी लसीकरण घेण्यात आले.त्यामध्ये लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाली अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निभोरा पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली. त्यावेळी आपल्या गावातील लोकांना प्राधान्य द्या बाहेर गावातील लोकांना लसीकरणासाठी घेऊ नका अशा प्रकारच्या तोंडी तक्रारी नागरिकांनी केल्या.त्यावेळी उपस्थित सरपंच ताईबाई आत्माराम कोळी,उपसरपंच विलास पाटील, ग्रा प सदस्य, पोलीस पाटील दत्तू पाटील,आरोग्य सेवक S P बोरोले,आरोग्य सेविका S F चंदनकर,आशा वर्कर सुलभा योगेश पाटील,जया योगेश महाजन,व देवकाबाई बापू पाटील,योगिता भाऊराव पाटील,शिपाई समाधान कोळी,राजेंद्र महाजन, यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!