धामोडी येथे पूर्णवेळ आरोग्य सेवक मिळावा यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची निवेदनाद्वारे मागणी

धामोडी प्रतिनिधी – (राहुल जैन मो.८३९०३७२६६४ )

धामोडी येथे आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ आरोग्य सेवक उपलब्ध करून द्यावा यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी रावेर लोकसभा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गावात आरोग्य सेवक नाही त्यामुळे गावकर्यांना उपचारासाठी रावेर येथे जावे लागते. त्यामुळे गावकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. होणारी गैरसोय टाळण्यासाठी धामोडी येथे आरोग्य सेवक मिळावा अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित प. स.सभापती कविताताई कोळी, सरपंच ताईबाई कोळी, ग्रामपंचायत सदस्य स्विटी पाटील, कल्पना पाटील, आशाबाई पाटील, मनिषा पाटील,अर्चना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनकर पाटील, उपसरपंच लखन पाटील, विनोद पाटील, आत्माराम कोळी, जगदीश पाटील, निवृत्ती पाटील , दुर्गेश पाटील, पवन पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, नारायण पाटील,देवानन रमेश महाजन, लिलाधर महाजन, ईश्वर पाटील, गणेश महाजन, प्रशांन्त पाटील, देवेंद्र जैन, समाधान कोळी, राजेंद्र महाजन,इ ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!