दगडीवीहीर येथे निवडणूक बूथ लावण्यात यावे – युवासेने ची मागणी….
दहिवेल प्रतिनिधी – ( राहुल राठोड )
साक्री तालुक्यातील , ग्रुप ग्रामपंचायत उभंड पैकी दगडीविहीर येथे अंदाजे ७०० ते ८०० लोकसंख्या असुन मतदारांची संख्या ही जवळपास २२१ असुन त्याठिकाणाहुन २ ग्रामपंचायत सदस्य निवडुन येत असतात . परंतु सदर गावात स्वातंत्र्य काळापासुन ते आजतागायत बुथची व्यवस्था करण्यात आलेली नाही . त्यामुळे गावातील बरेशचे मतदाता है मतदान करण्यापासून वंचित राहत असतात . दगडीविहीर येथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा असुन मराठी शाळेत निवडणुक बुथ सुरु केल्यास १०० टक्के मतदान होण्यास हातभार लागेल . दगडीविहीर येथुन चार ते पाच कि.मी. अंतरावर मतदान करण्यासाठी जावे लागते म्हणुन गावकरी कंटाळा करीत असतात त्यामुळे १०० टक्के मतदान होतच नाही . तरी महोदयांना नम्र विनंती की , दगडीविहीर येथु निवडणुक बुथ सुरु झाल्यास १०० टक्के मतदान होईल व कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही . तरी मला आशा आहे की , मी केलेल्या विनंतीचा आपण लवकरात लवकर विचार करुन योग्य ती कार्यवाही कराल असे निवेदन देण्यात आले त्यावेळेस उपस्थित युवा सेना विभाग प्रमुख राहुल भाऊ राठोड, पत्रकार अजय अहिरे.