गुजरात हद्दीतून नंदुरबार शहरात अवैधरित्या वाहून आणला जाणारा सुमारे 37 लाख 71 हजार रुपये किमतीचा गुटखा साठा सह आईसर ट्रक जप्त…

दैनिक महाराष्ट्र सारथी नंदूरबार प्रतिनिधी.

गुजरात हद्दीतून नंदुरबार शहरात अवैधरित्या वाहून आणला जाणारा सुमारे 37 लाख 71 हजार रुपये किमतीचा गुटखा साठा सह आईसर ट्रक जप्त करण्यात आला.

उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमी मीळाली होती. त्यानुसार सापळा रचून तपासणी केली असता MH-18. BG 3747  क्रमांकाचा एक आयसर ट्रक पहाटे नंदुरबार कडे संशयास्पपद रित्या येताना दिसला. आयसर चालकालां विचारले असता त्याने उडवा उडविची उत्तर दिली. म्हणून झडती घेतली असता महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला विमल गुटका भरलेला आढळून आला. आईसर ट्रक मुद्देमालासह जप्त करून उपनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आला.

जप्त केलेला गुटका 37 लाख 71 हजार 768 रु  किमतीचा आहे. या प्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!