कारमध्ये शारीरिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

साओ पाउलो

3 ऑगस्ट

ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 15 वर्षीय मुलीचा कारमध्ये सेक्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांनी म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही. दरम्यान, हा गुन्हा संशयास्पद मृत्यू म्हणून नोंदवला गेला आहे आणि त्याची गंभीरपणे चौकशी केली जात आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की साओ पाउलो येथील 15 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय पुरुषासोबत सेक्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

26 वर्षीय तरुणाने पोलिसांना सांगितले की, गॅबि-एली डिक्सन आणि मी आमच्या कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत होतो. या दरम्यान डिक्सन बेशुद्ध पडली. नंतर तिला क्युबाटाओ, सो पाउलो येथील यूपीए जार्डिम कास्केरो वैद्यकीय दवाखाण्यात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला.

त्या व्यक्तीने सांगितले की, ’या दरम्यान, गॅबि-एली डिक्सनचे ओठ आणि त्वचा पिवळी झाली आणि तिचे हात हात वळले. तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:20 वाजता मृत घोषित केले.

राज्य सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या मते, गॅबि-एली डिक्सनवर उपचार करणार्‍या परिचारिकांना तिच्या योनीमध्ये रक्त आढळले. पोलिसांनी रुग्णालयाकडून हिंसाचाराची माहितीही घेतली, परंतु परिचारकांनी अत्याचाराची कोणतीही चिन्हे नसल्याचे सांगितले.

या व्यक्तीने 15 वर्षांच्या गॅबि-एली डिक्सनशी संबंध असल्याचा दावा केला आहे. तथापि, डिक्सनच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, तिची त्या व्यक्तीशी असलेल्या संबंधांची माहिती नव्हती. यासह, कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की डिक्सन कोणत्याही आजाराने ग-स्त आहे की नाही याची खात्री नाही.

ब्राझील मध्ये, सहमतीने संभोगाचे वय 14 वर्षे आहे आणि यामुळे पुरुषावर लैंगिक अपराधाचा आरोप लावण्यात आलेला नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!