संविधान रक्षक , महाक्रांतीनायक , भीम आर्मी चीफ भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदर्शाने -भीम आर्मीचं स्वाभिमानी नेतृत्व , समाजरक्षक कर्मयोद्धा मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या असीम प्रेरणेतून….

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

भीम आर्मी महाराष्ट्राचा बुलंद वैचारिक आवाज मा.रमाकांतजी तायडे यांच्या नेतृत्वाखाली २०० तरुणांचा उत्स्फूर्तपणे भीम आर्मीत जाहीर प्रवेश. -जळगाव जिल्हाप्रमुख मा.गणेशभाई उर्फ भुराभाई सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोडदौड…

चोपडा तालुका प्रचार-प्रसिद्धी प्रमुख मा.दिपकजी महाजन यांनी केली
बौद्ध धम्म स्वीकारण्याची घोषणा…

जळगाव जिल्ह्यात , चोपडा तालुक्यातील ,एक नाही , दोन नाही तर तब्बल ०८ गावातील सुमारे २०० तरण्याबांड युवकांनी , संविधान रक्षक महाक्रांतीनायक भाई चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व , समाजरक्षक कर्मयोद्धा मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या ज्वलंत भीमकार्याने प्रभावित होऊन , जळगाव जिल्ह्यातील अत्यंत प्रख्यात समाजसेवक डॉ.योगेशजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आणि जळगाव जिल्हाप्रमुख , डॅशिंग मास लिडर मा.गणेशजी उर्फ भुराभाई सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व महाराष्ट्र राज्य भीम आर्मीचे बुलंद वैचारिक नेतृत्व मा.रमाकांतजी उर्फ जोजोभाई तायडे यांच्या उपस्थितीत भीम आर्मीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्ह्याचे संघटक , युवकांचे प्रेरणास्थान असणारे डॉ.योगेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख मा.गणेशभाई सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली अडावद गावात झालेल्या ह्या कार्यक्रमात भीम आर्मीचे राज्यनेते मा.रमाकांतजी तायडे , जिल्हा महासचिव मा.श्रीकांतभाई वानखेडे , जिल्हा मुख्य संघटक मा.विक्रमभाऊ प्रधान, यावल तालुका कार्याध्यक्ष मा.निलेशभाई सपकाळे , यावल तालुका उपाध्यक्ष मा.आकाशभाऊ बिऱ्हाडे व अन्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह्या नेत्रदीपक कार्यक्रमात चोपडा तालुकाध्यक्ष म्हणून मा.गोकुळभाऊ साळुंके , चोपडा तालुका उपाध्यक्ष पदी मा.गौतमजी साळुंके , चोपडा तालुका मुख्य संघटक पदी मा.अजयभाऊ साळुंके आणि चोपडा तालुका प्रचार-प्रसिद्धी प्रमुख म्हणून मा दिपक महाजन यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
ह्यावेळी दिपक महाजन यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याची जाहीर घोषणा केल्यानंतर अवघा चोपडा तालुका शहारून निघाला , टाळ्यांच्या कडकडाटात दिपकजींचे स्वागत करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी मा.भैय्यासाहेब साळुंके यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले
.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!