पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नाना पटोले यांनी आशेपार्ह बोलल्या बाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करा – भाजपाची मागणी
चोपडा प्रतिनिधी – ( हेमकांत गायकवाड mob.- 7798202488 )
आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल अपमानजनक व धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून त्वरित अटक यावी या आशियाची मागणी आज रोजी निवेदनात चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व ओबीसी आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष व वाचाळवीर नाना पटोले यांनी काल भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ” मि मोदीना मारू शकतो व मि मोदीना शिव्या ही देऊ शकतो” असे बेताल वक्तव्य करून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अपमानच केलेला नाही तर एक प्रकारे मा.पंतप्रधान यांना धमकी देणारे वक्तव्य केले. यावरून कांग्रेसची मा.मोदीजी बद्दल ची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते या वक्तव्यच्या निषेधार्त आम्ही भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा चोपडा तालुक्यातील पदाधिकारी सदर निवेदनामार्फत मागणी करतो की असे बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरुद्ध त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.अन्यथा भाजपा व ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल याची नोंद निवेदन देते वेळेस उपस्थित शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,अँड एस डी सोनवणे,प स सदस्य भरत बाविस्कर,युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील,शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष सिमा सोनार,माजी शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,सरचिटणीस हनुमंत महाजन,सरचिटणीस सुनिल सोनगिरे,सरचिटणीस मनोहर बडगुजर,जेष्ठ नागरिक शहर अध्यक्ष यशवंत जडे,जेष्ठ क्रार्यक्रता आघाडी शहर उपाध्यक्ष लक्ष्मण कावीरे,जितेंद्र नारायण पाटील,शक्ती केंद्र प्रमुख परेश धनगर,शक्ती केंद्र प्रमुख योगेश पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,ओबीसी शहर अध्यक्ष सुरेश चौधरी,आर्थिक आघाडी ता अध्यक्ष नितीन राजपुत,सोशल मिडीया प्रमुख विजय पाटील,सोशल मिडीया अँप प्रमुख धर्मदास पाटील,धिरज सुराणा,विलास बारी,शेखर सोनार,या सह असंख्य कार्यक्रते उपस्थित होते.