मराठी भाषा अभ्यासाने करिअरच्या नव्या वाटा शोधता येतात – प्रा. डॉ संदीप माळी

चोपडा प्रतिनिधी –( डॉ.सतीश भदाणे mob.-9975595887 )

पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे मराठी संवर्धन पंधरवाडा अंतर्गत बुधवारी १९ जानेवारी रोजी प्रा डॉ संदीप माळी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे तर मार्गदर्शक प्रा डॉ संदीप माळी, संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर हे ऑनलाइन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ किशोर पाठक यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी भाषा संवर्धनाविषयी सांगितले. डॉ संदीप माळी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, मराठी भाषा अभ्यासाने करिअरच्या नव्या वाटा शोधता येतात. त्यासाठी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशील लेखनात सहभागी व्हावे. मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी मुद्रितशोधन, जाहिरात लेखन, प्रसारमाध्यमे, अनुवादक क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, निवेदन क्षेत्र, इत्यादी. अनेक क्षेत्रात आपले करिअर करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अध्यक्षीय समारोपात डॉ महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तेव्हाच तो विद्यार्थी काहीतरी करू शकतो. ज्ञानासोबत व्यासंग व सकारात्मकता देखील महत्त्वाची आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ किशोर पाठक तर आभार प्रा अरुण मोरे यांनी मानले…

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!