चोपडा येथे संतांची मांदियाळी महिनाभर कीर्तन महोत्सव संत योगीजी बापू यांचे आशीर्वाद…
चोपडा प्रतिनिधी –
चोपडा येथे दिनांक 5 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात रोज रात्री 8-10या वेळेत कीर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आठ डिसेंबर रोजी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व एक जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे 28 दिवस रोज हरिपाठाच्या अभंगावर नामवंत कीर्तनकारान्ची कीर्तने आयोजित करण्यात आलेली आहेत. संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर तेली समाज मंगल कार्यालय चोपडा च्या प्रांगणात भव्य दिव्य अशा या महोत्सवाची सुरुवात दिनांक 5 डिसेंबर पासून रोज रात्री आठ ते दहा या वेळेत होत आहे. यावेळी ह भ प सोपान महाराज मराठखेडे, कैलास महाराज करूंगीकर, विजय महाराज देवरे चोपडेकर, अण्णासाहेब फराटे महाराज आळंदीकर ,खंडेराव महाराज टोनगे आळंदीकर ,सुदर्शन महाराज धुळेकर, भरत महाराज म्हैसवाडीकर, श्याम महाराज शास्त्रि पिंपळगावकर, अशोक जी महाराज शिरपूरकर, के डी चौधरी सर, ताराचंद महाराज आळंदीकर, प्रसाद महाराज बागुल चोपडेकर, गजानन महाराज अमोदेकर, प्रभुदास माऊली माचलेकर , माधव महाराज धानोरकर, विवेक महाराज वेलेकर, पांडुरंग महाराज आवारकर, ह भ प गाथा मूर्ती पांडुरंग महाराज घुले देहूकर, जनार्दन महाराज मराठखेडेकर, अंकुश महाराज मनवेलकर, भावेश महाराज विटनेकर, शशिकांत महाराज भवरखेडेकर ,श्री श्री 1008 महामंडलेश्वर ह भ प सूर्यभाननंदजी सरस्वती महाराज शेळगावकर, गजानन महाराज चौगावकर, ह भ प पोपट महाराज कासारखेडेकर बापु महाराज लासूरकर, ह भ प प्रेममूर्ती ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर व काला कीर्तन ह-भ-प गोपीचंद महाराज सुंदरगडी चोपडेकर या नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने आयोजित केली आहेत. अनेक संत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, संतांच्या मांदियाळीचा अनुभव यावेळी मिळणार आहे . या कार्यक्रमात सर्व ह.भ.प. विश्वनाथ महाराज, निंबा महाराज ,रविंद्र महाराज ,भरत महाराज, प्रकाश महाराज, दिलीप महाराज ,भागवत महाराज, कल्याण महाराज, श्याम लोहार, समाधान महाराज ,मधुकर अण्णा वेलेकर, प्रकाश चौधरी चोपडा ,प्रशांत चौधरी, ज्ञानेश्वर महाराज नेरकर या नामवंत गायनाचार्य यांची साथ लाभणार आहे. गुरुप्रसाद महाराज कदम आळंदी, कृष्णाजी माऊली राखुंडे आळंदी, लक्ष्मण महाराज चोपडा या मृदंगाचार्य यांची साथ लाभणार आहे. लीलाधर महाराज ,विठ्ठल महाराज, लक्ष्मण महाराज हे विणेकरी चोपदार म्हणून आपली जबाबदारी पार पडणार आहेत. लासुर येथील नाटेश्वर साऊंड सिस्टिम आपली जबाबदारी पार पाडत असताना अशा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा यांनी केले असून, या कार्यक्रमासाठी संत श्री योगी जी बापू महाराज यांनी भरभरून आशीर्वाद दिले आहे.दि.दोन रोजी योगिजि महाराज यांना निमंत्रण देण्यात आले. आपले आशीर्वाद देताना बापूजी म्हणाले की या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन सफल राहणार आहे .या कार्यक्रमामुळे कोरोना काळात दिवंगत झालेल्या ,कोरोनाने बळी पडलेल्या सर्व आत्म्यांना सद्गती मिळेल आणि हा कार्यक्रम नावारूपाला येईल असे भरभरून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाला एक दिवस मी उपस्थित राहील असेही संत योगी जी बापू यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ह भ प बापू महाराज लासूरकर, ह-भ-प गोपीचंद महाराज सूंदर गढी चोपडाकर ,ह भ प तेजस महाराज चहार्डीकर हे घेत असून, या कीर्तन महोत्सवास रोज रात्री आठ ते दहा या वेळेत भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या काळात गोपीचंद महाराज यांची गो कथा, अशोकदासजी महाराज यांची संत श्री संताजी जगनाडे महाराज चरित्र कथा व संत श्री उत्तमकृष्णजी शास्त्रीजी महाराज यांची भागवत कथा होनार असून याचाही लाभ भाविकांनी घ्यावा असे नम्र आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.